शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात राजकीय राडा; फुके-पटोलेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 19:09 IST

Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे भंडाराचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना विचारले असता सदर रक्कम आयकर विभागाच्या सुपूर्द केली असून ते चौकशी करीत असल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.नेमके काय घडले साकोलीत?साकोली पोलिसांत नितीन फुके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ डॉ.परिणय फुके साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सहा दिवसापासून ते साकोली येथे मुक्कामी आहेत. त्यांचा प्रचार करीत आहेत. शुक्रवारी दिवसभर त्यांनी डॉ.परिणय फुके यांचा साकोली येथे प्रचार केला. त्यानंतर रात्री १० वाजता ते भोजन करून मुक्कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीयो त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्यात रिकी पटोलेसह दोन जण होते. त्यानंतर पाठोपाठ दुसरी गाडी आली. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले होते. रिंकी पटोले यांनी त्यांची गाडी बंद करून माझ्या पोटाला बंदूक लावून जबरदस्तीने गाडीत टाकले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. कपडे फाडण्यात आले. गाडीत पैशाची बॅग आहे, ती तुझी आहे असे कबूल कर नाहीतर जीवाने मारतो, असे रिंकी पटोले व नाना पटोले यांनी म्हटल्याचे या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर नाना पटोले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. याठिकाणी ३० ते ४० जणांनी मारहाण केली. दरम्यान तेथे पोलीस पोहचले, अन्यथा माझा जीव गेला असता असे नितीन फुके यांनी आपल्या तक्रारीतून म्हटले आहे. या मारहाणीत नितीन जखमी झाले.यावरून साकोली पोलीस ठाण्यात काँग्रेस उमेदवार नाना पटोले, रिंकी पटोलेसह ३० ते ४० जणांविरुद्ध ३६३ (अपहरण), ५०६ (जीवे मारण्याची धमकी) यासह १४३, १४७, १४८, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची दुसरी बाजू अशी आहेविधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पैशाचे पाकीट वाटत असल्याच्या संशयावरून झालेल्या वादात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून पालकमंत्री तथा साकोलीचे भाजप उमेदवार डॉ.परिणय फुके यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीर्थानंद विनोद पटोले यांनी साकोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपले काका नाना पटोले यांच्या प्रचारासाठी आले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता कोजागिरी कार्यक्रमाला जात असताना लाखांदूर फाट्यावर एक पांढºया रंगाची गाडी अंधारात उभी दिसली. काही लोक पाकीट वितरीत करीत होते. कशाचे पाकीट विचारले असता पैशाचे पाकीट वाटत असल्याचे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. त्यावरून आम्ही हा प्रकार थांबविण्याचा प्रकार केला. त्यावरून वाद घालून वाहनातील दोघांनी काठी व तलवारीने मारहाण केली. जितेंद्र पटोले यांच्या डोक्यावर प्रहार झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. तेथील एका इसमाला पैशाच्या बॅगसह आमच्या स्कॉर्पीयोवर बसविले, त्याला नाव विचारले असता दीपक लोहिया रा.नरखेड असल्याचे सांगितल्याचे या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर घटनेची माहिती नाना पटोले यांना देऊन आम्ही प्रचार कार्यालय गाठले. त्यानंतर साकोली पोलीस ठाणे गाठून पैशाचे पाकिट जमा केले असे या तक्रारीत नमुद आहे.दरम्यान आम्ही पोलीस ठाण्याबाहेर बोलत असताना डॉ.परिणय फुके व ३० ते ४० लोक तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत आपणाला जबर दुखापत झाल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी दीपक लोहिया, पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह ३० जणांविरुद्ध १७१ (ब) (१) (ई), १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेbhandara-acभंडाराAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019