शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद न मिळाल्याने पटोलेंचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:28 IST

स्वस्त लोकप्रयिता, स्वार्थाचे राजकारण करण्यासाठी व गोडगोड बोलून वेळ काढून नेणारे नाना पटोले यांना फक्त आणि फक्त मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, असल्याचा आरोप आमदार बाळा काशीवार यांनी केला. साकोली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

ठळक मुद्देपटोलेंचे राजकारण स्वार्थाचे : बाळा काशिवार यांचा पत्रपरिषदेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : स्वस्त लोकप्रयिता, स्वार्थाचे राजकारण करण्यासाठी व गोडगोड बोलून वेळ काढून नेणारे नाना पटोले यांना फक्त आणि फक्त मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, असल्याचा आरोप आमदार बाळा काशीवार यांनी केला. साकोली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.आ. काशीवार यांनी, पटोले हे पूर्वी काँगे्रसमध्ये होते. तेव्हाही ते आमदार होते. मात्र काँग्रेसचे सरकार शेतकरी हिताचे नाही, असा आरोप करीत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. फक्त राजीनामे देऊन जनतेची कामे होत नाही. ती करवून घ्यावी लागतात. पटोले हे साडेतीन वर्षे खासदार होते. या कारकीर्दीत त्यांनी एकही विकासाचे काम केले नाही.गोसेखुर्द येथील प्रकल्पाचे कामासाठी निधीची गरज होती. सदर प्रकल्प हे केंद्राअंतर्गत येत असल्याने त्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याचे काम हे पटोलेचे होते. मात्र त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाविषयी काहीच प्रयत्न केले नाही. साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प रखडलेला आहे. मात्र या प्रकल्पाकडेही पटोले यांनी कधी लक्ष दिले नाही.या साडेतीन वर्षाच्या कारकीर्दीत एकही विकासात्मक कामे केली नाही. फक्त गोडगोड बोलून व जनतेला खोट्या भुलथापा देऊन वेळ काढून नेली. आता २०१९ मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मतदारासमोर मते मागायला विषयच उरला नाही. परिणामी आपला पराजय होईल या भितीमुळेच व भाजप सरकारणे त्यांना मंत्रीपद दिले नाही. यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पटोलेच्या राजीनाम्यामुळे भाजपाला काहीच फरक पडणार नाही, असे आ. काशीवार म्हणाले.या पत्रपरिषदेला नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लाणी, सभापती लखन बर्वे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, लाखनी तालुका अध्यक्ष पद्माकर बावनकर, नगरसेवक रवि परशुरामकर यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती सर्व नगरसेवक व साकोली, लाखनी व लाखांदूर येथील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.