शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकी बंद; रेती घाटावर तस्करांचा धुमाकूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 23:11 IST

सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे.  महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी थांबविण्याकरिता मोठा गाजावाजा करून तुमसर तालुक्यातील सुकडी देवाडी व तामसवाडी सेवरा येथील रेती घाटावर पोलीस चौकी उभारली होती. 

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मोठा गाजावाजा करून सुकळी ( दे.) व तामसवाडी (सी.) येथे रेतीचोरी थांबविण्याकरिता पोलीस चौकी उभारण्यात आली होती. परंतु मागील चार दिवसांपूर्वी येथील पोलीस चौकी बंद केल्याने रेती तस्कर पुन्हा साखरे झाले असून या दोन्ही रेती घाटांवर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे.  महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी थांबविण्याकरिता मोठा गाजावाजा करून तुमसर तालुक्यातील सुकडी देवाडी व तामसवाडी सेवरा येथील रेती घाटावर पोलीस चौकी उभारली होती. पंधरा ते वीस दिवस या गटातून त्यांची चोरी बंद झाली होती. चार दिवसांपूर्वी अचानक येथील पोलीस चौकी बंद करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही रेती घाटांवर रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसून येते.

इतर घाटातही तीच स्थिती

- तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या नदीपात्रात उच्च गुणवत्तेचा रेतीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रेती तस्करांची नजर या रेती घाटाकडे आपसूकच आहे. येथील रेतीला मध्य प्रदेशात व नागपूर येथे मोठी मागणी आहे. तुमसर तालुक्यात सुकडी ( दे.) तामसवाडी (सी.) चारगाव, ढोरवाडा, माडगी, उमरवाडा, बपेरा, वारपिंडकेपार,  आष्टी, चांदमारा, नाका डोंगरी येथे रेती घाट असून केवळ उमरवाडा येथील रेती घाटाचा शासनाने लिलाव केला आहे. परंतु तोही सध्या बंद असल्याची माहिती आहे. उर्वरित रेती घाटातून रेतीचोरी करण्यात येते.

ट्रॅक्टर चालकाकडून मागणी- सुकळी (दे.) येथे वैनगंगा नदीचे पात्र विस्तीर्ण असून येथे उच्च दर्जा असलेल्या रेतीचा मोठा साठा उपलब्ध आहे. येथे ट्रॅक्टर चालकाकडून महिन्याला दहा हजारांची मागणी एका स्थानिक व्यक्तीने केली आहे. त्या व्यक्तीची येथे दादागिरी सुरू  आहे. एक स्थानिक रेती तस्कर मात्र मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत आहे. 

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी