शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पोलीस पाटलांच्या पाठीवर शाबासकीची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:05 IST

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गावात घडणाऱ्या गुन्ह्यांसह अन्य माहितींची खडान्खडा माहिती पोलीस विभागाला देण्याची महत्वाची भूमिका गावातील पोलीस पाटील पार पडत आहेत. मात्र, नावातच ‘पाटीलकी’ भूषविणाऱ्या या पोलीस पाटलांचा पोलीस विभागाने कधीही गौरव केला नाही. ही परंपरा यावर्षी भंडारा पोलीस विभागाने मोडीत काढली आहे.लाखनी येथील कार्यक्रमात साकोली, लाखनी व पालांदूर पोलीस ...

ठळक मुद्देपोलीस विभागाने केला गौरव : लाखनी येथे राज्यातील पहिला उपक्रम

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : गावात घडणाऱ्या गुन्ह्यांसह अन्य माहितींची खडान्खडा माहिती पोलीस विभागाला देण्याची महत्वाची भूमिका गावातील पोलीस पाटील पार पडत आहेत. मात्र, नावातच ‘पाटीलकी’ भूषविणाऱ्या या पोलीस पाटलांचा पोलीस विभागाने कधीही गौरव केला नाही. ही परंपरा यावर्षी भंडारा पोलीस विभागाने मोडीत काढली आहे.लाखनी येथील कार्यक्रमात साकोली, लाखनी व पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे २५० पोलीस पाटलांचा सहृदय सत्कार करण्यात आला. पोलीस पाटलांचा सत्कार करण्याचा हा राज्यातील पहिला उपक्रम ठरला आहे.गावातील तंटे गावातच मिटावे यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून गावस्तरावर तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली आहे. तंटामुक्त समिती आली तेव्हापासून या समितींवर प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असून त्यांना गौरविण्यातही येते. मात्र, पूर्वापारपासून प्रत्येक गावात पोलीस पाटीलांची नियुक्ती करण्याची परंपरा आजही अबाधित आहे. मात्र इमानेइतबारे काम करणाºया पोलीस पाटलांच्या कार्याची दखल आजपर्यंत पोलीस प्रशासनाने घेऊन त्यांचा सत्कार केल्याचे कधीच बघायला मिळाले नाही. पोलीस पाटलांची ही व्यथा यावर्षी भंडारा पोलीस विभागाने समजली.साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या पुढाकारातून साकोली उपविभागातील लाखनी, साकोली व पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे २५० पोलीस पाटलांचा सहृदय सत्कार लाखनी येथे सोमवारला पार पडला. यातून पोलीस पाटलांना प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, लाखनीचे तहसीलदार रविंद्र राठोड, साकोलीचे तहसीलदार अरविंद हिंगे, लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे, साकोलीचे पोलीस निरीक्षक आर. पिपरेवार, पालांदुरचे अंबादास सुनगार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परशुरामकर यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला.पोलीस पाटील हे गावातील प्रतिष्ठेचे पद असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा पोलीस पाटलांना दुपटीने अधिकार देण्यात आले आहे. सामाजिक तथा धार्मिक एकोपा जोपासलेल्या पोलीस पाटलांचा हा सोहळा भविष्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे.- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.गावात राहून पोलीस विभागाला वेळोवेळी गुन्हेगारीची माहिती देणाऱ्या पोलीस पाटलांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे. या गौरवामुळे त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल सोबतच पोलिसांप्रती आदर वाढून सलोखा निर्माण होईल. पोलीस पाटलांच्या प्रेरणेतून गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यासाठी सहकार्य मिळेल.- श्रीकांत डिसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली.