शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळाचा एमडी बावनेला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 05:07 IST

भंडारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात सामील महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला गुरुवारी दुपारी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

भंडारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात सामील महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला गुरुवारी दुपारी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी बावनेला सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.महामंडळात केलेल्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्याशी संगनमत करून या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप श्रावण बावने याच्यावर आहे. ‘लोकमत’ने हे घोटाळे उघडकीस आणले होते. बावनेला पुणे सीआयडीच्या पथकाने राजकोटमध्ये शिताफीने अटक केली.बावनेपूर्वी भंडारा येथील साठे महामंडळातील कर्मचारी प्रताप पवार याला वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली आहे. भंडारा येथे २४ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. बावने हा व्यवस्थापकीय संचालक असल्यामुळे महामंडळाचा निधी भंडारा येथे वर्ग करून त्यानंतर रोखीने रक्कम काढत होता. गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक रमेश मेश्राम यांनी ९ जून २०१५ला पोलिसांत तक्रार केली होती.बावनेला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, अ‍ॅड. प्रमोद भुजाडे यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी बावनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी श्रावण बावने याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाचे पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी एस. जे. नेवले यांच्या पथकाने भंडाºयात आणले होते.