शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस राहतात गळक्या आणि पडक्या निवासस्थानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:52 IST

समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना गळक्या आणि पडक्या शासकीय निवासस्थानात रहावे लागत आहे. घराची विवंचना आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत.

ठळक मुद्देव्यथा सदनिकांची : गळणारे छत, जीर्ण भिंतींना जागोजागी तडे; १५ पैकी केवळ तीन प्रस्तावांना मंजुरी

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना गळक्या आणि पडक्या शासकीय निवासस्थानात रहावे लागत आहे. घराची विवंचना आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. धोकादायक वसाहतीत जीव मुठीत घेवून पोलिसांचे कुटुंब राहत असून कर्तव्यावर असताना पावसाळ्याच्या दिवसात पोलिसांचे सर्व लक्ष आपल्या घरातील चिला पिल्यावर असते. पोलीस वसाहतींची ही दुरवस्था दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र अद्यापही त्यात यश आले नाही.भंडारा जिल्ह्यात १७ पोलीस ठाणे असून त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्याही शेकडोंच्या घरात आहेत. कुठलीही घटना घडल्यास सर्वात प्रथम पोलिसांना पाचारण करण्यात येते. मात्र त्यांच्या सोयीसुविधांबद्दल कुणीही आवाज उठवित नाही. शासनाने त्यांच्या राहण्याच्या सुविधांबाबत विचार करून पोलीस वसाहतीची निर्मिती केली. मात्र जीर्ण झालेल्या सदनिकांमध्ये पोलिस कर्मचाºयांना रहावे लागत आहे. गळणारे छत, भिंतीला तडे गेलेल्या इमारतीत आयुष्यभर जीवन व्यतीत करावे काय, असा प्रश्नही कर्मचारी विचारतात. आंतरीक सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृह खात्यातीलच कर्मचाºयांची निवासस्थानांची अशी अवस्था असेल तर न बोललेले बरे.जिल्ह्यात एकूण १७ पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचाºयांसाठी सदनिका बांधकामा संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य शासनाकडे १५ प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी फक्त तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यात भंडारा शहर पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत, साकोली येथे एसडीपीओ कार्यालय व ७५ सदनिका आणि कारधा ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत कार्यालयाची इमारत, एसडीपीओ कार्यालयची इमारत व ११५ सदनिकांच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात सदर बांधकामाबाबत गृहनिर्माण विभागामार्फत टेंडर काढले जाणार आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाºयांसाठी ७०० पेक्षा जास्त सदनिकांची गरज असताना फक्त तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :Policeपोलिस