शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

पोलीस वसाहत झुडपी जंगलाच्या गर्तेत

By admin | Updated: December 18, 2014 00:33 IST

पोलीस ठाणे मोहाडीच्या मागील भागात झुडपी जंगल व कचरा वाढल्याने तिथे लपून बसलेले विषारी साप सरळ पोलीस..

सिराज शेख मोहाडीपोलीस ठाणे मोहाडीच्या मागील भागात झुडपी जंगल व कचरा वाढल्याने तिथे लपून बसलेले विषारी साप सरळ पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आले आहेत. त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी व तक्रार करण्यास आलेले नागरिक भयग्रस्त झाले आहेत. याला मुख्यत्वे पोलीस वसाहतीची दुर्दशा कारणीभूत आहे. पोलिसांच्या उत्थानासाठी सरकार नेहमी मोठमोठ्या घोषणा करीत असते. मात्र परिस्थिती या विपरीत आहे. राज्य शासनाच्या इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर शासनाचे नेहमी दुर्लक्ष असते. इतर विभागातील शासकीय कर्मचारी आपल्या संघटनेमार्फत शासनावर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करण्यास बाध्य करू शकते. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांची संघटनाच नसल्याने त्यांना कोणीच वाली नाही. २४ तास आॅनड्युटी असणारे पोलीस मात्र शासकीय आवासापासून वंचित आहेत. मोहाडी पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला लागूनच पोलीस वसाहत तयार करण्यात आली होती. मात्र देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे या वसाहतीची दुर्दशा झाली. या वसाहतीतील मोडकळीस आलेल्या घरात कोणीच पोलीस कर्मचारी राहत नसल्याने या ठिकाणी मोठमोठे गवत, कचरा, झुडपी जंगले तयार झालीत. झाडीझुडपी इतकी घनदाट आहेत की या ठिकाणी जर एखादा व्यक्ती लपून उभा राहिला तरी तो दिसणार नाही. वसाहतीतील घरात माती, दगड, केरकचरा असल्याने येथे सापांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी दिवसाही कोणी जात नसल्याने सापासाठी ही जागा वरदान ठरली आहे. मात्र कधी कधी हेच विषारी साप भटकत भटकत पोलीस ठाण्यात येतात व मग एकच धावपळ सुरु होते असे चित्र अनेक वेळा पहायला मिळाले आहे.पोलीस वसाहतीसाठी मोहाडी - भंडारा राज्य मार्गावर एक ते दीड एकर जागा अनेक वर्षापूर्वी घेण्यात आली होती. ही जागा पोलीस स्टेशन मोहाडीच्या अगदी जवळच आहे. मात्र अजूनपर्यंत या जागेवरही पोलिसांचे घरे बांधण्यात आले नाही. विशेष म्हणजे या जागेवर काही दिवसापर्यंत पोलीस वसाहतीची जागा असे लिहिलेले फलक दिसत होते. तेही फलक आता दिसेनासे झाले आहे. या जागेबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात पूर्ण माहिती उपलब्ध नाही. या जागेचे कागदपत्रे जिल्हा मुख्यालयात असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांना वेळी अवेळी कर्तव्य बजावण्यासाठी त्यांचे पोलीस ठाण्याजवळ राहणे आवश्यक असते. यासाठी पोलीस वसाहत उपयुक्त ठरते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे पोलिसांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. मोहाडी पोलीस वसाहतीची दुर्दशा त्याचे जिवंत उदाहरण होय.