शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-नागरिकांचे नाते विश्वासाचे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:17 IST

नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य नाही तर पोलिसांप्रती ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे आणि शासनाला सुद्धा हेच अपेक्षित आहे.

ठळक मुद्देविनिता साहू : नागरिकांच्या समस्यावर ‘आॅन द स्पॉट’ निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य नाही तर पोलिसांप्रती ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे आणि शासनाला सुद्धा हेच अपेक्षित आहे. पोलीस आणि नागरिकांचे नाते हे विश्वासाचे असावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.कारधा पोलीस ठाण्या अंर्तगत चांदोरी या गावी आयोजित फिरत्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पोलिस निरिक्षक रवींद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक लांडे व सरपंच रंभांबाई नागदेवे उपस्थित होते.विनिता साहू म्हणाल्या, पोलीस विभागाने केवळ गुन्हे नोंदणीच नाही तर शासनाच्या लोकाभिमुख योजना सुद्धा नागरिकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे, याच भावनेतून भंडारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून 'फिरते पोलीस स्टेशन' हा उपक्रम राबविला जात आहे. आजही नागरिक पोलीस ठाण्यात यायला घाबरतात. समस्या ुग्र रूप धारण करतात. पोलिसांविषयी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही भीती दूर व्हावी व नागरिकांच्या समस्यांचा योग्य वेळी निपटारा व्हावा म्हणूनच आम्ही आपल्या दारी आलो आहो. मोकळ्या मनाने आपल्या समस्या व तक्रारी मांडा, असे आवाहन विनिता साहू यांनी केले. जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे घरून निघुन जाण्याचे प्रमाण अधिक आहे असे सांगून साहू म्हणाल्या की, आई वडील व मुलांमध्ये विश्वासाचे नाते असायला हवे. मुलांशी संवाद वाढवा, त्यांचे म्हणणे एकूण घ्या, त्यांच्यावर भरोसा दाखवा.पोलीस विभागाची १०९१ ही खास महिलांसाठी हेल्पलाईन आहे. या सोबतच अँप, फेसबुक पेज व व्हाट्सअ‍ॅप नंबर वर आपण आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन विनिता साहू यांनी केले. कौटुंबिक वाद, किरकोळ वाद, मारहाण, शेतीचे भांडण, आपसातील वाद यासह ज्या समस्या पोलीस स्टेशन समोर येऊ शकत नाही अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन हा उपक्रम राबविला जात असल्याचे संजय जोगदंड यांनी सांगितले.फिरते पोलीस स्टेशन हा उपक्रम शासनाने राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला आहे. फिरते पोलीस स्टेशनचा भंडारा पॅटर्न तेलंगणा, चंदीगड व पश्चिम बंगाल या राज्यात राबविला जात आहे. मागील वर्षापासून जिल्हाभरात ८९१ कार्यक्रम घेण्यात आले व २२० तक्रारीचा निपटारा करण्यात आला. या उपक्रमासाठी ७ प्रोजेक्टर प्राप्त झाले असून ते सात पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत. शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस