शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: August 25, 2015 00:44 IST

मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली.

सिनेस्टाईल प्रकार : तुमसर पोलीस ठाण्यात बयाण सुरूतुमसर : मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या एका तरुणीला दोन तरुणांनी दुचाकीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणीने समयसूचकतेने दुचाकीवरून उडी घेतली. त्यानंतर आश्रयासाठी लपण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांनी तिला शोधून दुचाकीने घेऊन जात होते. दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर तरुणीच्या अपहरणाचा डाव फसला.तुमसर येथील इंदिरानगरात १९ वर्षीय तरुणी आईसोबत राहते. पितृछत्र नसलेल्या ही मुलगी व तिची आई मोलमजुरीची कामे करतात. रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रोशन चामट रा.जवाहरनगर (गोवरी) व त्याचा मित्र हे दोघे त्या तरुणीच्या घरी आले. त्यावेळी ती झोपलेली होती. झोपेतच रोशनने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून केसात भांग भरले.त्यानंतर दुचाकीने तिला घेऊन गोवरी (जवाहरनगर) कडे निघाले. त्यावेळी समयसूचकता ओळखून तिने दुचाकीवरून उडी मारली. त्यानंतर लगतच्या एका घरात आश्रयाकरीता हाक मारली. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. आवाजामुळे ती त्या तरुणांना दिसली. त्यानंतर या दोन युवकांनी दुचाकीवर बसवून तिला जवाहरनगरकडे घेऊन निघाले. दरम्यान, मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिराजवळील मार्गावर गस्तीवर असलेल्या मोहाडी पोलिसांना ते दिसले. पोलिसांनी त्या तरुणांची दुचाकी अडवली. चौकशीदरम्यान या तरुणीने पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी तुमसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना बोलाविले. तुमसर पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ती मुलगी व तिच्या आईचे बयाण नोंदविण्यात आले आहे. आता ही तरुणी तुमसरातील आपल्या आत्याकडे राहत आहे.रोशन चामट हा त्या तरुणीचा दूरचा नातेवाईक आहे. सन २०१४ मध्ये रोशनचा अपघात झाला होता त्यावेळी ही तरुणी आईबरोबर गोवरी येथे रोशनच्या घरी गेली होती. या दोघांचे लग्न होणार होते, परंतु या तरुणीचा लग्नाला विरोध होता, अशी माहिती तिने बयानात दिली आहे. यासंदर्भात तुमसर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता बयान घेणे सुरू असून अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)रविवारच्या मध्यरात्री दोन तरुण एका तरुणीला दुचाकीवर बसवून जात होते. त्यांना चौंडेश्वरी मंदिराजवळ रोखण्यात आले तेव्हा मुलीने सांगितलेल्या आपबितीवरुन तुमसर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यांची चौकशी तुमसर ठाण्यात सुरू आहे.- सुभाष चौधरी,सहायक उपनिरिक्षक, मोहाडी.