शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे आरोपीला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:35 IST

पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

ठळक मुद्देनिघवी येथील घटना : ४८ तासानंतरही गुन्ह्यातील साहित्य जप्त नाही

आॅनलाईन लोकमतभंडारा : पवनी तालुक्यातील निघवी येथे राजकारणाच्या वैमन्यश्यातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणात युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान ४८ तासानंतरही पवनी पोलिसांनी याप्रकरणातील साहित्य जप्त केले नाही. सोबतच महिलेला मारहाण व विनयभंग केलेली असतानाही केवळ आरोपींना वाचविण्याकरिता पोलिसांनी आवश्यक असलेली कलम दाखल केली नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा पराभव झाला. गावात मंडईनिमित्त दंडारीचा कार्यक्रम असल्याने घटनेच्या दिवशी महेश हा गावातील एका पानटपरीवर बसला होता. यावेळी निवडणुकीच्या कारणावरून ब्राम्हणकर यांनी महेश फुंडे याच्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर ब्राम्हणकर याने महेशला पानठेल्यावरील खर्रा घोटण्याचा लाकडी पाटीने बेदम मारहाण केली. यात महेश गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला सोडविण्यासाठी महेशचा भाऊ बंबू फुंडे व त्याची आई शांताबाई हे धावून आले. यावेळी ब्राम्हणकर याने बंबू व त्याच्या आईला मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत आईच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटले. या झटापटीत आईचा विनयभंग करण्यात आला. ग्रामस्थांच्या मध्यस्थीने भांडण सोडून जखमी महेशला पवनी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दोन दिवस ठेवल्यानंतरही डॉक्टरांनी त्याच्यावर थातूरमातूर औषधोपचार केल्याने त्याची प्रकृती खालावली. यामुळे तेथील डॉक्टरांनी महेशला थेट नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान रुग्णाची सुविधा व खान्या-पिण्याची व्यवस्था होणार नसल्याने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले.जखमी महेशवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान घटनेला ४८ तासांचा अवधी लोटला असूनही पवनी पोलिसांनी याप्रकरणात आवश्यक असलेले मारहाणीचे पुरावे व जखमी महेशचे रक्ताचे भरलेले कपडे अद्यापही जप्त केलेले नाही. सोबतच जखमीच्या आईचा विनयभंग झालेला असतानाही याप्रकरणात पवनी पोलिसांनी केवळ आरोपीला वाचविता यावा यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.