शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर पोळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:55 IST

भंडारा शहरातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा बाजार परिसर, गणेशपूर, शुक्रवारी परिसर, जलाराम चौक, मेंढा येथे याठिकाणी पोळा भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या.

ठळक मुद्देपावसाची हजेरी : एक नमन गौरा हर हर महादेवचा गुंजला गजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव बैलपोळा. शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. एक नमन गौरा हर हर महादेवचा गजर गावागावात गुंजला. पोळ्यात रंगलेल्या झडत्यांनी चांगलीच रंगत आली.भंडारा शहरातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा बाजार परिसर, गणेशपूर, शुक्रवारी परिसर, जलाराम चौक, मेंढा येथे याठिकाणी पोळा भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. याठिकाणी बैलांची पूजा करण्यात आली. गणेशपूर येथील पोळ्यात उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षीस देण्यात आले. त्यात सुहास भुरे, हिरामण मेहर, संजय साठवणे, भैय्यालाल थोटे, रामभाऊ खोब्रागडे, राजकुमार कांबळे, प्रवीण मते यांच्या बैलजोडींना गौरविण्यात आले.पोळ्याचा खरा उत्साह दिसून आला तो ग्रामीण भागात. पालांदूर पोळा भरविला असता वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. या पावसातही शेतकºयांचा उत्साह कुठे कमी झाल्याचे दिसत नव्हते. आंधळगाव येथे बैल पोळ्याला आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. दांडपट्टा खेळत पोळा उत्सव साजरा करण्यात आला. पवनी तालुक्यातील कोंढा येथेही पोळा साजरा झाला. चिचाळ येथे पोळ्यात प्रथम क्रमांक शिवसागर अहिरे यांच्या बैल जोडीने पटकाविला.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे आजच तान्हा पोळाही साजरा करण्यात आला. त्यावेळी चिमुकल्यांनी नंदीबैलासोबत स्वच्छतेचे महत्व सांगणारे फलक लावले होते. पवनी तालुक्यातील धानोरी येथे घरोघरी बैलांची पूजा करून पोळा सण साजरा करण्यात आला.झडत्यांनी आणली रंगतसजविलेले बैल पोळ्याखाली आल्यानंतर शेतकºयांतील प्रतीभेला चांगलाच बहर आला. एकाहून एक सरस झडत्यांची बरसात झाली. एक नमन गौरा हर हर महादेवचा गजर करीत झडत्या देण्यात आल्या.