शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पोकलँडने नदीपात्रातील रेतीचा उपसा

By admin | Updated: March 29, 2015 00:56 IST

नदी पात्रात केवळ अर्धा मीटर रेती शिल्लक असताना नियमबाह्य सर्रास मशीनद्वारे पोकलँड रेती उत्खनन सर्रास तुमसर तालुक्याती नदी घाटावर सुरू आहे.

लोकमत विशेषमोहन भोयर तुमसरनदी पात्रात केवळ अर्धा मीटर रेती शिल्लक असताना नियमबाह्य सर्रास मशीनद्वारे पोकलँड रेती उत्खनन सर्रास तुमसर तालुक्याती नदी घाटावर सुरू आहे. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे येथे अभय असल्याचे समजते. महसूल प्रशासनात कारवाईचे अधिकार असल्याने ते कारवाई करू शकतात, असा सल्ला जिल्हा खनिकर्म अधिकारी देत आहेत. भूजल तथा पर्यावरण विभागाच्या आदेशाला येथे मूठमाती दिली जात आहे. पर्यावरणाला या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. खनिकर्म अधिकाऱ्यांनी रेती घाटांचे नाव सांगा असे आवाहन केले.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील महाराष्ट्र शासनाने आठ रेती घाटांचा लिलाव या हंगामात केला. भंडारा जिल्ह्यात एकूण ३० रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. सर्वात जास्त रेतीघाट (आठ) जिल्ह्यात तुमसर तालुक्यात आहेत. तुमसर तालुक्यातील आठ रेतीघाटातून शासनाला ४ कोटी ३ लाख ९ हजार ६१ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.सुकळी देव्हाडी ६९ लक्ष ६९ हजार, चारगाव दे. ६७ लक्ष ५५ हजार, बाम्हणी तुमसर ८५ लक्ष ५० हजार, देवनारा ११ लक्ष ७२ हजार, तामसवाडी सी. ८५ लक्ष, लोभी २० लक्ष ६० हजार, वारपिंडकेपार २८ लक्ष, आस्टी ३५ लक्ष असे महसूल प्राप्त झाले.तालुक्यातील सुमारे चार रेती घाटात अर्धा मीटर रेतीचा साठा नदीपात्रात आहे. या रेतीघाटातून मशीनद्वारे रेतीचे सर्रास उत्खनन सुरू आहे. भूजल विभागाने रेती उत्खननाची नियमावली तयार केली. यात ज्या रेतीघाटावर अर्ध्या मीटर तथा त्यापेक्षा कमी रेती आहे. त्या घाटातून मशीनने पोकलँड तथा जेसीबी रेती उत्खनन करू नये असे कडक आदेश दिले आहेत. नियमबाह्य रेती काढल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचा नियम आहे. तसे आदेश राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी व महसूल प्रशासनाला दिले आहे. अर्ध्या मीटर तथा त्यापेक्षा कमी रेती नदीपात्रात असेल तर जेथून मजूरांकडूनच रेती मॅन्युअल काढता येते, असे नमूद आहे. या रेतीघाटांचा लिलावसुद्धा अल्प किमतीत राज्य शासन करते हे विशेष. तुमसर तालुक्यात शासनाने आठ रेतीघाटांचा लिलाव यावर्षी केला. त्यापैकी चार रेतीघाटात केवळ अर्धा मीटर किंवा त्यापेक्षा कमी रेतीसाठा उपलब्ध आहे. शासनाने या रेतीघाटांचा लिलाव करायला नको पाहिजे होते. तो कां केला हा संशोधनाचा विषय आहे. मानवी हातांनी रेती उत्खनन करणे सहज शक्य नाही. जिल्ह्यात पवनी तालुक्यात ५ रेतीघाट किंमत ५ कोटी ४१ लाख ६९ हजार, मोहाडी ६ (३ कोटी ८२ लाख), साकोली ४ (३१ लाख ९५ हजार), लाखनी ४ (४७ लाख ३६ हजार), लाखांदूर २ (१ कोटी २७ लाख), भंडारा १ टाकळी (१ कोटी ५९ लाख). भंडारा जिल्ह्यातून शासनाला एकूण १६ कोटी ९२ लाख ६१ हजार ५५८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेती उत्खनन सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंतच करता येते.