शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

वास्तूपूजनाच्या भोजनातून 104 जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

गजानन खोकले व सुनील खोकले यांनी कोथुर्णा येथे नवीन घर बांधले. बुधवारी त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूजन आणि भोजनाचा कार्यक्रम होता. गावासह परिसरातील गावातील आप्तस्वकीयांना भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. जवळपासच्या गावातील २०० पेक्षा अधिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. जेवण केल्यानंतर बुधवारी रात्री सर्वजण घरी गेले. मात्र गुरुवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्या, हगवण आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला.

ठळक मुद्देकोथुर्णाची घटना : गावातील उपकेंद्रात उपचार, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

लाेकमत न्यूज नेटवर्कवरठी : वास्तूपूजनाच्या कार्यक्रमातील भोजनातून तब्बल १०४ जणांना विषबाधा झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सर्वांवर गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोग्य विभागाने गावात धाव घेतली असून घरमालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गजानन खोकले व सुनील खोकले यांनी कोथुर्णा येथे नवीन घर बांधले. बुधवारी त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूजन आणि भोजनाचा कार्यक्रम होता. गावासह परिसरातील गावातील आप्तस्वकीयांना भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. जवळपासच्या गावातील २०० पेक्षा अधिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. जेवण केल्यानंतर बुधवारी रात्री सर्वजण घरी गेले. मात्र गुरुवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्या, हगवण आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे गावकऱ्यांनी आरोग्य उपकेंद्रात धाव घेतली. सुरुवातीला कमी असलेली संख्या हळूहळू वाढू लागली. स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल १०४ नागरिकांना विषबाधा झाल्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे वास्तूपूजनाचे आयोजक घरमालक गजानन खोकले यांनाही विषबाधा झाली.  सर्वांवर कोथुर्णा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात आले. कुणालाही गंभीर स्वरुपाची लक्षणे नसल्याने उपचार करुन सुटी देण्यात आली. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.या घटनेची माहिती होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रशांत उईके, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार अक्षय पोयाम, उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली.

घरमालकावर गुन्हा दाखल- राज्यात कोरोनाची स्थिती अद्यापही बिकट आहे. लाॅकडाऊन १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेनमध्ये शिथिलता दिली. मात्र सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असतानाही गजानन खोकले यांनी वास्तूपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. नियमापेक्षा अधिक आप्तस्वकीयांना विनापरवानगी भोजनासाठी बोलाविले. यामुळे त्यांच्याविरुद्ध तलाठी सिमेश हुमणे यांनी तक्रार दिली. त्यावरुन वरठी पोलीस ठाण्यात गजानन खोकले व सुनील खोकले यांच्यावर भादंवि २७०, १८८, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत. ग्रामीण भागात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून गावचा प्रश्न असल्याने कुणी पुढे येऊन तक्रार करीत नाही. त्यामुळेच ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वेगाने वाढला. त्यानंतरही कुणी काळजी घेताना दिसत नाही.

पाण्यातून विषबाधेचा संशय- वास्तूपूजनाच्या भोजनासाठी घराशेजारच्या विहिरीचे पाणी वापरण्यात आले. तर पिण्यासाठी नळाचे पाणी वापरण्यात आले होते. या पाण्यातूनच विषबाधा झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लहानशा कोथुर्णा गावात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्य