शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चारगाव रेती घाटावर यंत्राने रेती उत्खनन सुरु

By admin | Updated: February 11, 2017 00:22 IST

लोकप्रतिनिधी मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसांपासून चारगाव (दे.) रेती घाटातून नियमबाह्यरीत्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु करण्यात आले.

तहसीलदार म्हणतात जेसीबी नव्हती : महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हतुमसर : लोकप्रतिनिधी मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसांपासून चारगाव (दे.) रेती घाटातून नियमबाह्यरीत्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु करण्यात आले. शुक्रवारी तुमसरच्या तहसीलदारांनी चारगाव रेती घाटावर भेट दिली. परंतु जेसीबी तेथून गायब करण्यात आली. नदी पात्रात १० ते १२ जण मजूर होते. नदी घाटाजवळ १० ते १२ ट्रक रिकामे उभे होते हे विशेष.चार दिवसांपर्वूी आमदार चरण वाघमारे यांनी ब्राम्हणी रेती घाटाची पाहणी कारवाईचे निर्देश तहसीलदारांना दिले होते. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. मागील सहा दिवसांपासून येथे रेतीचे उत्खनन बंद आहे. गुरुवारी आमदार चरण वाघमारे मुंबईला रवाना झाले. तेव्हापासून चारगाव रेती घाटावर जेसीबीने रेती उत्खनन सुरु आहे. गुरुवारी व शुक्रवारी येथे रेती उत्खनन सुरु होते. शुक्रवारी तहसीलदार डी. टी. सोनवाने, नायब तहसीलदार एन. पी. गौड यांनी चारगाव येथील रेती घाटाला भेट दिली. तेव्हा जेसीबी तेथून गायब होती. नदी पात्रात केवळ मजूर उपस्थित होते. रेती कंत्राटदारांची येथे एक साखळी आहे. महसूल कर्मचारी अधिकारी कार्यालयातून निघून कुठे जातात याची खडा न खडा माहिती संबंधित रेती घाटावर पोहचविण्याचे काम या साखळीतील सदस्य करतात. त्यामुळे कारवाई होत नाही. चारगाव रेती घाटातून तात्काळ जेसीबी मशीन कशा गायब झाल्या हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)पर्यावरणाला धोका जेसीबी, पोकलँन्ड मशीनने रेती उत्खननाला पर्यावरण व भूजल विभागाने बंदी घातली आहे. या दोन्ही विभागाची परवानगी असेल तरच नदी पात्रातून यंत्राने रेती उत्खनन करता येते. तुमसर व मोहाडी तालुक्यातील एकाही रेती घाटावरुन यंत्राने रेती उत्खननाची परवानगी नाही अशी माहिती आहे.यंत्रावर कारवाईचा अधिकार नाहीनदी पात्रातून यंत्राने रेती उत्खनन सुरु असले तर महसूल प्रशासन केवळ जप्ती करु शकते. दंड आकारण्याचा अधिकार केवळ जिल्हा खनिकर्म विभागाला आहे. अशी माहिती आहे. तुमसर तालुक्यातील रेती घाटातून रेती उत्खनन करणारे, वाहतूक करणाऱ्यांचे रॅकेट सक्रीय आहे. या रॅकेटला कुणाचा आशिर्वाद आहे हा मुख्य प्रश्न आहे.शुक्रवारी दूपारी चारगाव(दे.) रेती घाटावर भेट दिली. तिथे जेसीबी नव्हती. नदी काठावर केवळ रिकामे ६ ते ७ ट्रक उभे होते. रेती उत्खनन करणाऱ्यांचे खबरी नेटवर्क आहे. ते समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. डी. टी. सोनवाने,तहसिलदार तुमसर