शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:06 IST

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, ....

ठळक मुद्देचरण वाघमारे : तुमसर व मोहाडी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

आॅनलाईन लोकमततुमसर/मोहाडी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनाला सुरूवात करावी, असे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी येथे तुमसर व मोहाडी पंचायत समितीत आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.तुमसरात जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य बाळकृष्ण गाढवे, मंगला कनपटे, रोशना नारनवरे, राजू ढबाले, अरविंद राऊत, अशोक बन्सोड, शिशुपाल गौपाले, खंडविकास अधिकारी आर.एम. दिघे, सहायक गटविकास अधिकारी एम.एस. मगर, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अभियंता बावनकर उपस्थित होते.तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीचा पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. सरपंच, ग्रामसेवकांनी पाणीपुरवठ्याची माहिती व गरज सांगितली. खंडविकास अधिकाºयांनी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, ग्रामसेवक, सरपंचांना बैठकीला बोलाविले होते. परंतु अनेक सरपंचांनी बैठकीला दांडी मारली. जि.प. सभापती शुभांगी राहांगडाले वगळता एकही जि.प. सदस्य बैठकीला आले नाही. प्रथमच निवडून आलेले सरपंचाची ही पहिलीच बैठक असल्यामुळे महिला सरपंचाची उपस्थिती लक्षणीय होती. तुमसर तालुक्यात सरपंच अभ्यासवर्ग घेण्यात येईल, असे आ. वाघमारे यांनी सांगितले. संचालन डॉ. भाष्कर चोपकर यांनी केले.मोहाडी येथे आयोजित बैठकीत पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, तहसिलदार सुर्यकांत पाटील, खंडविकास अधिकारी मोरे, कार्यकारी अभियंता दिलीप मैदमवार, उपविभागीय अभियंता बावनकर, जिल्हा परिषद सदस्य चंदु पिल्लारे, निलिमा इलमे, रामराव कारेमोरे, पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे, पं.स. सदस्य उमेश पाटील, भारत टेकाम, जगदीश उके, महादेव पचघरे, विशाखा बांडेबुचे, निशाद कळंबे, निता झंझाड, किरण भैरम उपस्थित होते.मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी गावातील संभाव्य पाणी टंचाईसाठी करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती देऊन बोरवेल व पाणी पुरवठा योजनेची मागणी केली.धोप गावाच्या टोलीवर पुरेशा पाणी मिळत नसल्याने नवीन पाण्याची टाकी देण्याची मागणी सरपंचानी केली. पारडी येथील सरपंचानी हातपंपावरच नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. वरठी येथे १४ हातपंपाची मागणी करण्यात आली.वासेरा ग्रामपंचायतीमध्ये लहानलहान पाच टोली असल्याने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.सरपंचांनी मांडल्या गावातील समस्यासालई खुर्द येथे एका व्यक्तीने हातपंप तोडून त्याठिकाणी घर बांधले. दलित वस्ती पाणीपुरवठा योजना तीन वर्षापासून बंद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेत एक लक्ष ९६ हजार रूपयांची दुरूस्ती करण्यात आली तरी ती नळयोजना बंद आहे, असे तेथील माजी सरपंचाने सांगितले.जांभोरा येथील स्मशानभूमीतील हातपंप जमिनीच्या आत जात असल्याचे सरपंचांनी निदर्शनास आणून दिले. डोंगरगांव येथे अनेक वर्षापासून पाणीटंचाई उद्भवत असते व नळयोजनेवर ३ लाख ८३ हजार रूपयांचे विज बिल थकीत असल्याने नळयोजना बंद असल्याचे सरपंचानी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सूर नदी काठावरील ग्रामपंचायतीनी मार्च, एप्रिलमध्ये होणाऱ्या पाणी टंचाईसाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सूर नदीत सोडावे यासाठी ठराव घेऊन सामूहिक मागणी करावी, असे आवाहन आ.वाघमारे यांनी केले. संभाव्य पाणीटंचाईवर करण्यात येणाºया उपाययोजनेची चुकीच्या माहिती देणाऱ्यां पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना आ.वाघमारे यांनी चांगलेच खडसावले.