शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

७२ तासांच्या शोधकार्यानंतर सापडला पीयूषचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:25 IST

दोन मित्रांसमवेत सूर नदी पात्रात पोहायला गेलेल्या पियुष बडवाईक या विद्यार्थ्याचा मृतदेह आज तिसºया दिवशी सकाळी अंभोरा जवळील तिड्डी नदी पात्रात आढळून आला.

ठळक मुद्देईकार्नियात फसून होता मृतदेह : आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन मित्रांसमवेत सूर नदी पात्रात पोहायला गेलेल्या पियुष बडवाईक या विद्यार्थ्याचा मृतदेह आज तिसºया दिवशी सकाळी अंभोरा जवळील तिड्डी नदी पात्रात आढळून आला. ३० आॅगस्ट रोजी पीयूष व त्याचे मित्र साहिल कावळे व यश सपाटे हे तिघेही पोहायला गेले होते. ते जिजामाता महाविद्यालयात इय्यता अकरावी विज्ञान शाखेत शिकत होते.बुधवारला सूर नदीच्या पात्रात वाहून गेल्यानंतर दुसºया दिवशीही गोसावी घाटापासून ते आंभोरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र वाहून गेल्याच्या ६० तासानंतरही त्याचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान आज सकाळी शोधमोहीमेदरम्यान तिड्डी नदी पात्रातील ईकार्निया वनस्पती अडकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनेच्या दिवशी पियुष बडवाईक, साहिल कावळे व यश सपाटे हे तिघेही मित्र शाळेत उशिरा गेले. दरम्यान, त्यांच्या शिक्षकाने शाळेत येण्यासाठी उशिर का? झाला असे तिघांनाही हटकले असता हे तिघेही तिथून कुणालाही न सांगता सायकलने थेट सूर नदीच्या गोसावी घाटावर गेले. त्यावेळी तिघेही नदीत उतरले. पोहून बाहेर येत असताना पियुष पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घाबरलेल्या या दोन मित्रांनी महाविद्यालय गाठून घडलेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितला.तोपर्यंत पीयूष पाण्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला पाठविले. या चमूने दिवसरात्र एक करून त्याचा शोध घेत राहिले. अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती.शोधमोहिमेदरम्यान शुक्रवाला तिड्डी नदी पात्रात ईकार्निया वनस्पतीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे जलस्तर वाढल्यामुळे जिल्ह्यातून वाहणाºया सूर नदी व वैनगंगा नदीसह नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे शोधमोहीमेदरम्यान अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पियुषचे वडील सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असून त्यांना दोन मुले आहेत. याप्रकरणाची भंडारा ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे.