शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नळ पाईपलाईनचे खड्डे जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर तात्पूरती दुरुस्ती केली जाते.

ठळक मुद्देतुकडोजी वॉर्डातील प्रकार : दहा दिवसांपासून नगरपरिषदेचे दुरुस्तीसाठी दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नळ दुरुस्तीच्या कामासाठी खोदकाम केलेले खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. गत आठ दिवसांपासून शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी वॉर्डातील काही नळधारकांच्या नळाला पाणी येत नसल्याने नगरपरिषदेकडून पाइपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले होते.यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर तात्पूरती दुरुस्ती केली जाते. मात्र यावर अद्यापही कायमस्वरुपी तोडगा न निघाल्याने येथे अपघात वाढले आहेत. परिसरात लहान मुले खेळत असताना या खड्यात पडून अनेकांना दुखापत झाली आहे. त्यामुळे जीव गेल्यावर नगर परिषद लक्ष देणार काय? असा संतप्त सवाल वॉर्डातील नागरिकांनी केला आहे.वॉर्डात रस्त्यासह आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शासकीय कार्यालयाचा परिसर असल्याने येथे नेहमीच वाहनाची वर्दळ असते. येथे नगरपरिषदेकडून कोणत्याच सुविधा वेळेवर मिळत नाहीत. परिसरातील नागरिक वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी भरुन देखील नागरिकांवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरातील नाल्यांच्या साफसफाईसह वॉर्डातील पाणी प्रश्न सोडवून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वॉर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गत काही वर्षांपासून त्या खड्यांची दुरुस्ती झालेली नाही. रस्ते काम अनेक वर्षापुर्वी झाल्याने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. जिल्ह्यातून विविध कामासाठी येणारे नागरिक या परिसरात विविध कार्यालयात येतात.परिसरात विविध शासकीय कार्यालय असल्याने येथे नेहमीच गर्दी राहते. दुय्यम निबंधक कार्यालयासमोर अनेकदा अस्ताव्यस्त वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना तासन्तास ताडकळत थांबावे लागते. कार्यालयातील कर्मचाऱ्यासंह कामानिमित्त येणारे नागरिक अस्ताव्यस्त वाहने लावतात. पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्यांना कोण कायद्या शिकविणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. वॉर्डातील पाणी समस्येंसह खड्ड्याची दुरुस्ती त्वरित न केल्यास आंदोलनाचा इशारा वॉर्डातील विलास तिडके यांच्यासह सम्राट अशोक सेनेचे तुलसीराम गेडाम यांनी केला आहे.फक्त पाहणी करुनच परत जातात कर्मचारीभंडारा नगरपरिषदेतील पाणी पुरवठा विभागात असणारे जुने कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या कर्मचाºयांना पुरेशी माहिती नसल्याने अनेकदा नळ योजनेचा बिघाड झाल्यास अंदाज येत नाही. त्यामुळे या परिसरात नळ दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहेत. येथून वाहने नेतांना वॉर्ड वासीयांची चांगली दमछाक होत आहे. यामध्ये अनेकदा खड्ड्यात पडून अपघात देखील झाला आहे. मात्र कर्मचारी दररोज नवीनच कारण सांगुन कामाची टाळाटाळ करीत आहे. याकडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.गेल्या दहा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. नळ दुरुस्तीसाठी वारंवार कर्मचाऱ्यांना सांगुनही टाळाटाळ होत आहे. दुरुस्ती त्वरित न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समस्या मांडणार आहे.-विलास तिडके,नागरिक तुकडोजी वॉर्ड, भंडारा

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा