शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

गुलाबी थंडीत फुलू लागली पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:51 IST

ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक वारसा : वन्य प्राण्यांच्या दर्शनासाठी गर्दी, शासनाचा महसूल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील निसर्गरम्य, मनमोहक पर्यटनस्थळाला पर्यटक रोज मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.भेट देत असलेल्या पर्यटनस्थळात विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पञ्ञा मेत्ता आंतरराष्ट्रीयस्तराचा महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायक यापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर व उमरेड कºहांडला, पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटनस्थळाचा समावेश आहे.पवनीपासून १२ किलोमिटर अंतरावर विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ भव्य वक्रद्वारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.पवनी पासून ३ किलोमिटर अंतरावरील रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघ द्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नाविण्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महाखुण मधील सम्यक संबुद्धाची ४० फुट उंच मूर्ती भव्य शांत सभागृहात मनाला शांती देते.पवनी हे ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्यांची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी अत्यंत वैभवशाली शहर म्हणून प्रसिद्ध होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपूरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजूला टेकड्यांवर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७ व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोट सदृष्य किल्ल्यामधून बंंदूका, तोफामधून गोळ्या मारण्याचे छिद्रे आहेत.हा किल्ला ऐतिहासिकतेची साक्ष देत आजही उभा आहे. पूर्व विदर्भाची काशी व मंदिराचे शहर म्हणून ओयखल्या जाणाऱ्या पवनीमध्ये विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची प्रतीमा ही १० व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूला गणेशाची प्रतीमा कोरली आहे. पाचवी प्रतीमा नैऋत्य दिशेला कोरली आहे. शिळास्तंभाचा वरचा भाग ११ इंच गोलाकार आहे. ही प्रतिमा आकर्षक आहे. पर्यटक या मंदिरासोबतच टेंभ्येस्वामी मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझी चा गणपती आदी मंदिरांनाही भेट देत आहेत. उमरेड कºहांडला पवनी वन्यजीव अभयारण्यातील जंगल घनदाट व विस्तीर्ण आहे. या जंगलात वाघ, बिबटे, हरिण, सांबर, चितळ, निलगाय व अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. येथे मोठ्या संख्येत असलेले वाघ पर्यटकांना आकर्षीत करीत आहेत.