शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपचे ‘छत्र’ हरविले

By admin | Updated: August 7, 2016 00:20 IST

आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहरनगर संचालित पेट्रोल पंपवर छत नाही.

आयुध निर्माणी पतसंस्थेचा पंप : ग्राहकांच्या सोयींकडे दुर्लक्षप्रल्हाद हुमणे जवाहरनगर आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहरनगर संचालित पेट्रोल पंपवर छत नाही. पावसाळ्यात ग्राहकांना पेट्रोल व डिझेल भरणे त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांना मुलभूत सोईसुविधा पुरविने भारत पेट्रोलीयमची जबाबदारी असताना याकडे पतसंस्था व अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. भंडारा जिल्हा एकमेव सहकारी तत्वावर पेट्रोलपंप सुरू आहे. येथे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पणावर असलेली आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची देखरेख आहे. येथे जवाहरनगर, पिपरी, साहुली, पेवठा, लोहारा, कोंढी, परसोडी, राजेदहेगाव, खरबी, ठाणा, चिखली, निहारवाणी येथील शेतकरी, आयुध निर्माणीचे दैनिक कर्मचारी व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ये-जा करणारे वाहन चालक या पेट्रोलपंपचा वापर करीत असतात. हा पेट्रोलपंप ग्रामपंचायत ठाणा येथील हद्दीत आहे. हा पेट्रोलपंप पतसंस्थेने २०१५ पर्यंत लिजवर भारत पेट्रोलीयम यास चालविण्यासाठी दिले आहे. या ठिकाणी आधी विस्तीर्ण आच्छादन होते. राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणामुळे भुईसपाट झाले. नव्याने पेट्रोल व डिझेल मशीन स्थापित करण्यात आली. मात्र सुमारे एक वर्षांचा कालावधी होत असतानाही छत नाही. सदर तीनही मशिनवर आच्छादन भारतीय पेट्रोलीयम कंपनीने तयार करून द्यायला हवे. पावसाळ्यामुळे वाहनांच्या वर्दळीने मशीन लगत खोल खड्डे पडले आहे. ग्राहकांना पिण्याचे पाणी, शौचालय व हवा केंद्र येथे नाही. येथील कार्यरत कर्मचारी रेनकोट वापरून ग्राहकांना पेट्रोल व डिझेलची विक्री करतात. येथे इथेनॉलयुक्त पेट्रोल वितरक असल्याने भरतांना वाहनांमध्ये पाण्याचा थेंब गेले असता वाहन नादुरूस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पेट्रोलपंपाची जबाबदारी भारत पेट्रोलीयम कंपनीकडे आहे. ग्राहकांसाठी सुविधा पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. अधिकारी येथील पेट्रोलपंपकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. समस्याबाबत कंपनीला वारंवार माहिती देण्यात आली आहे. ग्राहक सुविधा देण्यास भारत पेट्रोलीयम दुर्लक्ष करीत आहे.-विनोद मेश्राम,अध्यक्ष, आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी संस्था, जवाहरनगर.पेट्रोलपंप येथील मुलभूत सुविधा तेथील खरेदी विक्रीवर अवलंबून असते. उत्पन्नाच्या सोळा टक्के आम्हाला खर्च करता येतो. एमएसडी यांच्या मार्गदर्शनात कारभार चालतो. महिनाभरात समस्या निकाली निघेल.-कुंदन अवसरे, सेल्स अधिकारी भारत पेट्रोलीयम कंपनी, नागपूर.