शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत ९.७२ रुपयांनी वाढले पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे भंडारेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर, १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत बऱ्यापैकी ...

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : दररोज बदलतात दर, डिझेलच्या दरात १२.९९ रुपयांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे भंडारेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर, १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत बऱ्यापैकी घसरण झाली असली तरी केंद्र व राज्य सरकारकडून या दोन्ही अतिज्वलनशील पदार्थांवर विविध कर लादून त्याची वसूली वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. सध्या टर्बो व इथेलॉन मिश्रित अशा दोन प्रकारच्या पेट्रोलची विक्री होत आहे. परंतु, पेट्रोल मध्ये १० टक्के मिळविण्यात येणाऱ्या इथेलॉनचा खरा फायदा सरकारलाच व तेल कंपन्यांनाच होत असल्याचे दिसून येते. १ नोव्हेंबर २०१७ रोजी पेट्रोल प्रती लिटर ७६.५७ रुपये तर डिझेल ५९.८० रुपये होते. तर, रविवार २७ मे रोजी पेट्रोल ८६.२९ रुपये आणि डिझेल ७२.७९ रुपये प्रती लिटर होते. अवघ्या सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांमुळे इतर जिवनावश्यक वस्तूंवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या दरांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे अशी मागणी आहे.जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावरील दर बदलतात आॅनलाईन पद्धतीनेसरकारने पेट्रोल व डिझेलचे दर निश्चित करण्याचा विषय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर बदलतात. सदर बदलनारे दर जिल्ह्यातील ५० टक्के पेट्रोलपंपावर आॅनलाईन पद्धतीने बदलत असून उर्वरित ५० टक्के पेट्रोल पंपावरील दर मॅन्युअली पद्धतीने प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजता बदलविले जात असल्याचे शहरातील एका पेट्रोलपंप मालकाने सांगितले.दरवाढीचा लाभ सरकारलाचसध्या ८६.२९ रुपये प्रती लिटरने पेट्रोलची विक्री होत असून प्रती लिटर पेट्रोल विक्रीवर २.७६ पैसे विक्रेत्यांना मिळतात. या विक्री होणाºया पेट्रोलवर केंद्र सरकार २१.७५ रुपये आणि राज्य सरकारच्या २३.६२ रुपयांच्या कराचा समावेश आहे. राज्य सरकार फिक्स सेस म्हणून ९ रुपये व २५ टक्के इतर कर पेट्रोलच्या डिलर किंमतीवर आणि डिझेलच्या डिलर किंमतीवर फिक्स सेस १ रुपया तसेच २१ टक्के इतर कर लावत असल्याने याचा सर्वाधिक फायदा सरकारलाच होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.ऊस उत्पादकांना फायदाच नाहीऊसाच्या मळीपासून इथेलॉन हे इंधन सर्वाधिक केले जाते. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉनचा वापर होत आहे. इथेलॉनला पेट्रोलचा दर मिळत असला तरी त्याचा खरा फायदा ऊस उत्पादकांना होत नसल्याचे शेतकरी व शेतकºयांचे प्रश्न रेटणारे सांगतात. सरकारकडूनही शेतकºयांच्या ऊसाला योग्य भाव दिल्या जात नाही, अशी ओरडही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.निवडणूक काळात १९ दिवस रोखली दरवाढकर्नाटक निवडणुकीच्या कालावधीत तब्बल १९ दिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. सध्या महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात ६ रुपयांनी पेट्रोल तर २ रुपयांनी डिझेल स्वस्त असल्याचे जाणाकारांकडून सांगण्यात आले.इथेनॉलनयुक्त पेट्रोलचा त्रास पंप मालकांनासध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेलॉन मिक्स केल्या जाते. त्याचा संपर्क पाण्याशी आल्यास पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे होत ते तळाशी जाते. इथेलॉन चेक करण्यासाठी पेट्रोलपंप मालकांना तेल कंपन्या कुठल्याही सोयी-सूविधा पुरवित नाहीत. अनावधानाने पेट्रोल व इथेलॉन वेगवेगळे झाल्यास ते ग्राहकांच्या वाहनाच्या इंधन टँक मध्ये जावून नागरिकांची वाहन अचानक बंद पडल्यावरच पंप मालकांच्या लक्षात ते येते. इथेलॉन व पेट्रोल वेगवेगळे झाल्यावर पंप मालकांना नागरिकांच्या रोषाला पुढे जावे लागत असल्याने इथेलॉनयुक्त पेट्रोलचा सर्वाधिक त्रास पंप मालकांनाच सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.ब्राझीलमध्ये ३५ टक्केपर्यंत इथेलॉनचा वापरस्वदेशी इंधन म्हणून इथेलॉनची ओळख. देशातील पैसा देशातच रहावा, या हेतूने पेट्रोलमध्ये इथेलॉन मिस्क केल्या जाते. वास्तविक पाहता देशात कुठेही इथेलॉन ब्लेंडिंग होत नाही. ते केवळ मिक्स केल्या जाते. ब्राझीलमध्ये योग्य पद्धतीने इथेलॉनचा सुमारे ३५ टक्केच्यावर वापर होत असल्याचे एका अभ्यासू पेट्रोलपंप मालकाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात सर्वाधिक करदेशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील वाहनचालकांना इतर राज्यापेक्षा जादाच पैसे पेट्रोल व डिझेलसाठी मोजावे लागत आहेत.ग्राहक सुविधा क्रमांकाद्वारे कळतो झटपट खरा दरजिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोलपंपावर ग्राहकांना आजच्या दराबाबत सूविधा व्हावी या हेतूने एक विशिष्ट फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर एक ग्राहक सुविधा क्रमांक देण्यात आला आहे. त्या क्रमांकावर एसएमएस केल्यास तात्काळ ग्राहकाला त्या दिवशीचा पेट्रोल व डिझेलचा खरा दर सहज माहिती होत असल्याचे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.तेल कंपन्या होत आहेत गब्बरकेंद्र व राज्य सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांमुळे दिवसेंदिवस होत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा लाभ सरकारसह खºया अर्थाने तेल कंपन्यांना होत असल्याचा आरोप जनसामान्यांकडून केला जात आहे. गत काही वर्षांपासून तोट्यात असल्याचे सांगणाºया तेल कंपन्या सध्या फायद्यात आल्याचे बोलले जात आहे. तेल कंपन्या सध्या गब्बर होत असून सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता सरकारने त्वरित योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.