शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:45 IST

एक-एक पैसा गोळा करून लाख रूपये जमा झाल्यास आयुष्यात कामी पडतील, असे लहानपणी वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

ठळक मुद्देसर्वसामान्यांमध्ये आक्रोश : भाजपने दाखविले ‘अच्छे दिन’चे गाजर

प्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : एक-एक पैसा गोळा करून लाख रूपये जमा झाल्यास आयुष्यात कामी पडतील, असे लहानपणी वडिलधाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. आता अशाच एक-एक पैशाची वाढ करून सरकार वाहनचालकांना अक्षरश: ‘लूट’त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिवनाचा अविभाज्य घटक झालेल्या पेट्रोलच्या दरात मागील सहा महिन्यात दररोज पाच ते दहा पैशांची वाढ होत आहे. पेट्रोलच्या या दरवाढीने आता भडका उडाला आहे.काँग्रेसच्या कार्यकाळात वर्षातून किमान दोनदा पेट्रोल व डिझेलच्या दरात दोन ते तीन रुपयांची वाढ व्हायची. त्या तुलनेत सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया केंद्र सरकारने मागील सहा महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात नित्याने वाढ करीत आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटू लागली आहे.भाजप सरकारच्या कार्यकाळात १६ जून २०१७ ला पेट्रोलचे दर ७६.३४ पैसे होते. हे दर आता ८०.६० पैशांवर पोहचले आहे. या सात महिन्यात पेट्रोलच्या किमतीत पाच पैशापासून दहा पैशापर्यंत दररोज वाढ होत आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी तर गाठणार नाही ना? अश भीती वाहनचालकांना वाटू लागली आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून नागरिकांना वाहनांकरिता पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. यासह नव्याने आलेल्या अन्य कंपन्यांच्या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून पेट्रोलची सुुविधा उपलब्ध आहे.दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांची ही एक प्रकारे लुट असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटू लागली आहे.सकाळी ६ वाजता नवीन दर लागूयापूर्वी पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढल्यास मध्यरात्रीपासून ते लागू होत होते. मात्र आता सकाळी ६ वाजतापासून या दरांची अंमलबजावणी करण्यात येते. यासह येत्या काळात ग्राहकांना पेट्रोलची रसीद अत्याधुनिक मशिनच्या माध्यमातून देण्याची सुविधा पेट्रोलियम मंत्रालयाने केली असली तरी दिवसागणिक वाढणाºया दरामुळे वाहनधारक जेरीस आले आहे.दिवसभरात लाखो लिटरची विक्रीभंडारा जिल्ह्यात ४६ पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपवर महिनाभरात सुमारे ७ लाख लिटर पेट्रोल व सुमारे ३० लाख लिटर डिझेलची विक्री होते. एका जिल्ह्याचा विचार केल्यास या दररोजच्या दरवाढीत लाखो रुपये वाढ होत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे.जानेवारी महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलचे दर ७८.२३ रुपये प्रतीलिटर होते. त्यात आता २.३७ रुपये प्रतीलिटरमागे वाढ झाली असून ८०.६० पैशावर हा दर पोहचला आहे. डिझेलच्या किमतीत तब्बल ७.२१ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल १ जानेवारीला ६२.८० रु. प्रतीलिटर होते. त्यात वाढ होऊन ६६.६६ रुपये भाववाढ झाली आहे.पेट्रोलचे चढते भावमंगळवारला पेट्रोलपंपवर भाव बघितले असता सोमवारच्या तुलनेत त्यात वाढ झाल्याने दिसूून आले. सोमवारला ८०.४५ पैसे पेट्रोलचे दर होते. त्यात एका रात्रीत १५ पैशाची वाढ होऊन तो ८०.६० रुपयांवर पोहचला आहे. एकस्ट्रॉ प्रिमियमच्या पेट्रोलचे दर १५ पैशाने वाढले असून काल ८३.२० रुपये तर आज ८३.३५ रुपयावर पोहचला. डिझेल काल ६६.४६ पैसे प्रती लिटर होता. तो आज ६६.६६ पैशावर पोहचला आहे.