शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीला डावलून दीड एकरात पेरूची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:32 IST

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

ठळक मुद्देउच्च प्रतिच्या पेरूची मागणी : अनेक शेतकरी वळले फळबाग शेतीकडे

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळाला पाहून शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील एका शेतकऱ्याने नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड दीड एकरात करून त्याची जोपासना केली आहे.वारंवार निसर्ग शेतकऱ्याला हुलकावणी देतो व त्यामुळे त्याला नापिकीचा सामना करावा लागते सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकारचे शेती विरोधी धोरण तर दुसरीकडे निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांनी शेतीचा आता मार्ग बदलविला आहे. पारंपरिक शेतीला पाठ दाखवत तालुक्यातील महेश मेश्राम यांनी दीड एकर मध्ये ५५० पेरूची झाडे लावले.औषधीयुक्त नवीन प्रजातीच्या पेरूची लागवड करून त्यांची जोपासना करीत आहे. मेश्राम यांना ही बाब विचारली असता त्यांनी सांगितले काहींनी त्याला पेरूच्या शेतीसाठी मार्गदर्शन केले. महेशने शेतीत २०१४ मध्ये या झाडांची लागवड केल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या जोपासन्याचा कालावधी झाला आहे. एका झाडाला जवळपास ३० ते ५० पेरू लागलेले आहेत. या पेरूला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हेही पेरू डायबिटीज, हार्ट अटॅक अशा रुग्णांकरिता उपयुक्त आहे. त्यामुळे या प्रजातीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.हा पेरू अर्धा ते एक किलो वजनाचा असतो आणि स्थानीय बाजारात याला २० ते ३० रूपये प्रति किलो भाव येतो. पण नागपूरला गेलो असता या झाडाला ५० ते ६० होते. तो दिल्लीला विकण्याकरिता पाठवलं तर त्याला शंभर ते दीडशे रूपये प्रति किलो एवढे भाव मिळतात. झाडांची जोपासना कराण्याला मेहनत घ्यावी लागली.पेरू मोठे झाले असून त्याच्या संरक्षणासाठी जाळी लावावी लागली आहे. त्याच्यावर ती विशेष स्वरूपाचे पॉलिथिन लावावी लागते. यामुळे या पेरूची गुणवत्ता वाढते. ही प्रजाती छत्तीसगड येथे प्रसिद्ध आहे आणि या शेतकºयाने ही प्रजातीची पेरू प्रति झाडाला दीडशे रूपये देऊन विकत आणले. ज्या कंपनीकडून विकत घेतले त्यांनी लागवडीपासून याला मार्गदशनही केले आणि सेवा सुद्धा दिली.आजही कंपनीचे कर्मचारी येऊन याची पाहणी करून जातात. त्यामुळे शेतकºयाला घेणे सोपे जाते याबद्दल शेतकऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्याला सुरवातीला मेहनत करावे लागते. त्यानंतर या फळबागाचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे सांगितले.हे झाड सतत सहा महिन्यापर्यंत फळे देतो. यामुळे या फळबागपासून प्रतिवर्ष चार ते पाच लाखांचा लाभ होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तविले आहे. या नाविण्यपूर्ण शेतीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी शेतीला भेट देऊन पेरू शेतीची माहिती जाणून घेतली. यावेळी एॅग्रो असोसिएशनचे सचिव सुनिल पारधी, पंचायत समितीचे माजी सभापती कमाल शेख यांनीही शेतीला भेट देऊन माहिती घेतली.मात्र आता पेरूची लागवड बघून अनेकांनी पारंपारिक शेतीला सोडून फळबागाची शेती करण्यावर भर दिला आहे.