शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी मिळाली 27 ची, वृक्ष कापले 57

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 23:33 IST

आधीच तोडलेल्या मोठमोठ्या झाडांना तुकडे करून शासकीय वसतिगृहासमोर ठेवण्यात आले आहे. सिव्हिल लाइन प्रकरणात उपविभागीय अभियंता, सामाजिक बांधकाम विभाग भंडारा यांनी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी मागितली होती. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती परवानगी दिली. इतक्या जुन्या झाडांना तोडण्याची परवानगी मिळतेच कशी हा प्रश्न आहे. फक्त शासकीय वसाहत, सिव्हिल लाइन येथे वृक्षतोडीची मर्यादित परवानगी असताना सर्किट हाऊस येथील अशोक व इतर छोटे मोठे झाड तोडून परिसरात मागच्या बाजूला असलेले उद्यान बकाल करण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील शासकीय वसाहत परिसरातील २७ झाडांची छाटणी व कापणीची परवानगी भंडारा नगरपालिकेने सामाजिक बांधकाम विभागाला दिली होती. मात्र कंत्राटदाराने चक्क ५७ झाडे कापत असल्याचे सांगितले. ही झाडे कापत असताना सिव्हिल लाइन येथील रहिवासींनी तक्रार दिल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, ५७ झाडांची कापणीची परवानगी देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.यासंदर्भात  सिव्हिल लाइन येथील रहिवासी डॉ. सुहास गजभिये, उत्पादन शुल्क अधीक्षक गरजे यांनी मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांना तक्रार केली. मोक्याच्या ठिकाणी  पोहोचल्यानंतर जीवितहानी किंवा मालमत्तेस धोका होत नसताना सुद्धा झाडांची सर्रास मुळापासून कत्तल सुरू असून, ट्रॅक्टर-ट्रॉलिमध्ये माल भरून वाहतूक सुरू होती. याची तक्रार सामाजिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मेश्राम यांना केल्यानंतर तत्काळ काम थांबविण्यात आले. बंद असलेल्या क्वार्टर्समधील सर्वच झाडे जमीनदोस्त करण्यात आल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महाराष्ट्र वनविकास महामंडळ व्यवस्थापक यांच्या बंगल्यासमोरील झाडे सुद्धा कापण्यात आली होती. दोन दिवसांपासून हे कार्य सुरू होती. लोकमतने सर्वप्रथम याची दखल घेत वृत्तही प्रकाशित केले. आधीच तोडलेल्या मोठमोठ्या झाडांना तुकडे करून शासकीय वसतिगृहासमोर ठेवण्यात आले आहे. सिव्हिल लाइन प्रकरणात उपविभागीय अभियंता, सामाजिक बांधकाम विभाग भंडारा यांनी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी मागितली होती. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती परवानगी दिली. इतक्या जुन्या झाडांना तोडण्याची परवानगी मिळतेच कशी हा प्रश्न आहे. फक्त शासकीय वसाहत, सिव्हिल लाइन येथे वृक्षतोडीची मर्यादित परवानगी असताना सर्किट हाऊस येथील अशोक व इतर छोटे मोठे झाड तोडून परिसरात मागच्या बाजूला असलेले उद्यान बकाल करण्यात आले आहे. संबंधित विभागाचे कार्यालय इथेच असून, त्यांच्या डोळ्यादेखत ही कत्तल सुरू होती हे विशेष. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित लोकांवर महाराष्ट्र जैवविविधता नियमानुसार कार्यवाई करण्यात यावी, अशी मागणी शैलेंद्र सिंह राजपूत, वाइल्ड वॉच फाउंडेशन भंडारा यांनी केली आहे. भंडारा शहरातील झाडांच्या माहितीचा संग्रह करून, माहितीचे वर्गीकरण आणि मूल्यांकन करून त्यानंतर शहरातील झाडांचा हेरिटेजचा दर्जा निश्चित करावा व त्यांना ‘स्मारक’ घोषित करून प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक भंडारा यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आता काेणती कारवाई करते याकडे नजरा लागल्या आहेत.

प्रक्रियेचे पालन नाही - परवानगी देताना १९७५च्या अधिनियम कलम ८ (३) अन्वये अर्ज मिळाल्यावर ३० दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल तयार करणे, झाडांचे व्यक्तिशः निरीक्षण करून, जाहिरात देऊन व तसेच तोडणे आवश्यक असलेल्या झाडांच्या ठळक भागावर नोटीस चिकटवून योग्य ती जाहीर नोटीस देऊन सशर्त परवानगी देऊ शकतात. परवानगी दिल्याच्या १५ दिवसांपर्यंत कोणतेही झाड तोडता येत नाही. वृक्षतोडीवर आक्षेप असतील त्यांचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे असते. राज्यात हेरिटेज ट्री संकल्पना राबवण्यात येणार असल्याची घोषणा १० जून २०२१ला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या झाडांना हेरिटेज ट्रीचा दर्जा आहे. जे झाड कापले त्या झाडाच्या वयाइतकी किमान सहा फुट उंचीची झाडे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात लावण्यात यावी अशी तरतूद आहे. मात्र परवानगी देताना या संकल्पनेला मूठमाती देण्यात आली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग