शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘आधार’ची टक्केवारी वाढली

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

राष्ट्रीय ओळखीसाठी केंद्र सरकारने काढलेल्या आधारकार्ड योजनेत (युआयडी) जिल्ह्यातून ११ लक्ष ७३ हजार २०१ नागरिकांनी आधारकार्ड बनविले आहे.

११.७५ लक्ष लोकांनी काढले आधारइंद्रपाल कटकवार भंडाराराष्ट्रीय ओळखीसाठी केंद्र सरकारने काढलेल्या आधारकार्ड योजनेत (युआयडी) जिल्ह्यातून ११ लक्ष ७३ हजार २०१ नागरिकांनी आधारकार्ड बनविले आहे. याची टक्केवारी ९७.७३ आहे.सन २०११ च्या लोकसंख्येनुसार १२ लक्ष ३३४ नागरिकांपैकी ११ लक्ष ७३ हजार २०१ जणांनी आधारकार्ड बनविले आहे. यात जिल्ह्यातील ३५ ठिकाणी महा आॅनलाईनतर्फे आधारकार्ड केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यात सात केंद्र असून २ लक्ष ८० हजार ३० नागरिकांपैकी २ लक्ष ६६ हजार ०६१ नागरिकांनी आधारकार्ड काढले आहेत. याची टक्केवारी ९५ इतकी आहे. मोहाडी तालुक्यात २ लक्ष १९ हजार २६५ लोकांनी आधारकार्ड काढले आहेत. मोहाडी तालुक्यात येऊन अन्य तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड बनविल्याने मोहाडी तालुक्याची टक्केवारी १४५ इतकी आहे. तुमसर तालुक्यात २ लक्ष २६ हजार १०८ लोकसंख्येपैकी २ लक्ष ४ हजार ९८७ लोकांनी आधारकार्ड काढले. याची टक्केवारी ९०.६५ आहे. पवनी तालुक्यात १ लक्ष ५४ हजार ५८८ लोकसंख्येपैकी १ लक्ष ११ हजार ४९२ जणांनी आधारकार्ड बनविले आहेत. याची टक्केवारी ७२.१२ आहे. साकोली तालुक्यात १ लक्ष ३६ हजार ८७९ पैकी १ लक्ष ३२ हजार ९५२ जणांनी आधारकार्ड काढले असून त्याची टक्केवारी ९७.१३ आहे. लाखांदूर तालुक्यात १ लक्ष २३ हजार ५७३ नागरिकांपैकी १ लक्ष १६ हजार ९१७ जणांनी आधारकार्ड तयार करून घेतले आहे. त्याची टक्केवारी ९४.६१ आहे. लाखनी तालुक्यात १ लक्ष २८ हजार ५४५ लोकसंख्येपैकी १ लक्ष २१ हजार ५२७ जणांनी आधारकार्ड काढले असून त्याची टक्केवारी ९४.५४ इतकी आहे. जिल्ह्यात ३५ आधारकार्ड केंद्र असून भंडारा ७, मोहाडी ७, तुमसर ५, पवनी ४, साकोली ५, लाखांदूर ३, लाखनी ४ अशी केंद्रे आहेत. ८९ हजार ३४४ बालकांची नोंदणी० ते ५ वयोगटातील ८९ हजार ३४४ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. यात एकूण बालकांची संख्या ९४ हजार ८५९ आहे. याची टक्केवारी ९४.१८ इतकी आहे. भंडारा तालुक्यात १९ हजार ३०२, मोहाडी १३ हजार ५०, तुमसर १३ हजार ३८६, पवनी १२ हजार २९९, साकोली १० हजार ७७४, लाखांदूर १० हजार ३५ तर लाखनी तालुक्यात १० हजार ४९८ बालकांची नोंदणी करण्यात आली आहे.मुलांच्या नोंदणीची टक्केवारी ९०जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील मुलांच्या नोंदणीची टक्केवारी ८९.३६ इतकी आहे. यात २ लक्ष २७ हजार ४९१ मुलांची संख्या असून यातील २ लाख ३ हजार २९६ मुलांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व १३३१ शाळांमधून ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यात २६४, मोहाडी १५८, तुमसर २६१, पवनी १९७, साकोली १५५, लाखांदूर १४२ तर लाखनी तालुक्यात १५४ शाळा आहेत.