शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

आष्टीत गरदेव यात्रेला उसळणार जनसमुदाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:50 IST

तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते.

ठळक मुद्दे१५० वर्षांची परंपरा : लाकूड आणण्यासाठी १५० बैलजोड्यांची मदत

ऑनलाईन लोकमतगोबरवाही : तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. यावर्षीदेखील येथील जंगलातून सर्व धार्मिक विधी पूर्ण करुन १५० बैलजोड्यांच्या मदतीने लाकूड ओढत आणण्यात आले. या विधीसाठी भाविकांनी श्रध्देने व उत्साहाने सहभाग घेतला.१५० वर्षापासून धुलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या मेघनाथ (गरदेव) वांगागरी यात्रेकरिता दर तीन वर्षांनी जंगलातून मोठे लाकूड आणल्या जात. दोन लाकूड ज्यांची सावली एकमेकांवर पडते आणि त्यांचे रंग मित्त (काळा-पांढरा) असेल असा विशिष्ट झाडांना नर-मादी आणि शिव पार्वती संबोधून पूजा अर्चना करून विधिवत १५० बैल जोड्यांच्या सहाय्याने लगतच्या हमेशा येथील जंगलातून आष्टीत भरणाºया (वांगागरी) गरदेव यात्रेकरिता दोन विशिष्ट लाकूड आणल्या गेले. आणतांना लाकूड अटकलेली शेकडो नारळ फोडल्यावरच लाकूड सामोर खेचल्या जातो अशी आख्यायिका आहे.१५० वर्षापूर्वी बावनथडी नदीत मोठे पूर आले होते. त्यावेळी पुरात दोन मोठे लाकूड वाहत आष्टीत आले असता गावकऱ्यांनी ते लाकूड कापून अन्न शिजविण्याच्या कामात आणले असता अन्न शिजविण्याचे मातीचे भांडे (हांडी) फुटल्या गेले. अन्न वाया जावू लागला होता. त्यातच दुसºया वर्षी आष्टीवासीयांना मोठ्या दुष्काळाचा सामनाही करावा लागला. अन्न पिकविण्याकरिता पाणी तर सोडाच पिण्याचा पाणीही आष्टीवासीयांना नाही झाले नव्हते.दरम्यान आष्टी येथीलच शिवभक्त पुजारीच्या स्वप्नात मेघनाथ, वरुण राजाने साक्षात्कार दिला व नागरिकांनी केली चूक लक्षात आणून दिली की पुरात वाहत आलेले ते लाकूड नव्हते ते साक्षात शिव पार्वती होत्या. तुम्ही त्यांना कापून जाळल्याने निसर्ग कोपला आहे.त्यामुळे तुम्ही जंगलात अशा लाकडांचा शोध घ्या की ते रंगाने भिन्न असतील अर्थात काळे पांढरे असतील व उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची किरणे पडल्यावर एक दुसऱ्याची सावली एकमेकांवर पडेल आणि त्यातील एक झाड सरळ व दुसऱ्या झाडाला फाटा फुटला असेल नर मादी झाडे हेच शिव पार्वती आहेत. झाडांना लाकडांचा थर रचून वांगाला गर लावून चहू बाजूने फेकल्यावरच गावावरील कोप दूर होणार असे साक्षात पुजाºयाला साक्षात्कार झाल्याने गावकºयांनी धूळवडच्या दिवशीच असे विशिष्ट लाकूड जंगलातून आणून त्यांची पूजा अर्चना केली. त्याच वर्षी आष्टीकरांनी भरपूर पीक घेतले व समृद्ध झाल्याने गत १५० वर्षापासून दर तीन वर्षांनी विशिष्ट झाड शोधून धुलिवंदनाच्या दिवशी त्यावर वांग्याला गर लावून चारही दिशेने फेकल्या जाते.