शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कुष्ठरुग्ण शोध अभियानात जनतचे सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 21:58 IST

जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : जिल्हाधिकारी कार्यालयात कुष्ठरूग्ण शोध अभियानावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरुग्ण शोध अभियानबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी, कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. नितीन वानखेडे व आरोग्य अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. नितीन वानखेडे यांच्याकडून या अभियानाबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवक यांचेमार्फत प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबातील सर्व सदस्यांचे त्वचा रोग तपासणी करण्यात येईल. महिला सदस्यांची तपासणी आशा वर्करमार्फत व पुरुष सदस्यांची तपासणी चमुमधील पुरुष स्वयंसेवक यांचेमार्फत करण्यात येणार आहे.शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सर्व शाळांमध्ये दैनंदिन प्रतिज्ञेच्या वेळी कुष्ठरुग्ण शोध अभियानाबाबत गावातील स्थानिक आरोग्याशी संबंधीत कर्मचारीमार्फत कुष्ठरोगाविषयी तसेच या मोहिमेबाबत माहिती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे आठवडी प्रभातफेरीच्या दिवशी सदर मोहिमेबाबत घोषणा देण्याच्या सूचना देण्यात आले. गावपातळीवरील आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत गावातील सर्व नागरिकांना या मोहिमेमध्ये सहयोग आणि सहभाग घेण्याकरीता पंचायत समिती विभागामार्फत सूचना देण्याचे ठरविण्यात आले आहे.जिल्हयात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंबर पर्यंत घरोघरी राबविण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाचा मुख्य उद्देश जिल्हा कुष्ठरुग्ण मुक्त करण्याचा संकल्प साध्य करण्याच्या हेतूने तसेच जास्तीत जास्त नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणल्यामुळे कुष्ठरोग संर्सगाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयात १२ लाख १५ हजार ५१ घर संख्येसाठी १११६ पर्यवेक्षकांच्या २२३ टिम यांच्या मार्फत १४ दिवस अभियान राबविण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक घटक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, प्रसार माध्यमे, शाळा, महाविद्यालय विद्यार्थी यांना व जिल्ह्यातील सर्व जनतेला घरी तपासणीसाठी आलेल्या चमुला सहकार्य करुन सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.