शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

क्लेरियन कारखान्यात कामगारांचे प्रश्न प्रलंबित

By admin | Updated: September 7, 2015 00:50 IST

क्लेरीयन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यात सुमारे १५० कुशल अकुशल कामगार कार्यरत आहेत.

सोयी-सुविधांचा अभाव : राष्ट्रीय मजदूर मंचाची तक्रार तुमसर : क्लेरीयन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यात सुमारे १५० कुशल अकुशल कामगार कार्यरत आहेत. २१ वर्षे जुन्या कारखान्यात शासकीय नियमानुसार वेतनात विसंगती दिसून येते. येथे सोयी सुविधा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. १५ आॅगस्टला या कारखान्यातील एका कामगाराचा सुरक्षेच्या अभावी मृत्यू झाला होता. औद्योगिक नियोजन स्थायी आदेश १९४६ व बी.आय. आर.एक्ट १९५९ अंतर्गत सक्षम अधिकृत अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करण्यात आले नाही, अशी तक्रार राष्ट्रीय मजदूर, मंच तुमसर यांनी केली आहे.तुमसर रोड येथे क्लेरियन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्याची स्थापना सन १९९४ मध्ये करण्यात आली. येथे सुपारे १५० स्थायी व अस्थायी कामगार कार्यरत आहेत. वेतन व अन्य सुविधांचा येथे अभाव आहे. १५ वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रतिमाह मुळ वेतन व डी.ए. मिळून १७ हजार रुपये कुशल कामगारांना देणे, १० वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना मूळ वेतन महागाई भत्यासोबत १६ हजार रुपये देणे, १ ते ५ वर्ष सेवा दिलेल्या अकुशल कामगारांना मुळ वेतन, महागाई भत्ता जोडून १५ हजार रुपये देणे, नियुक्ती पत्र कामगारांना देणे, एक वर्ष झालेल्या कामगारांना कायम नियुक्ती पत्र देणे, वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून देणे, एका वर्षात आठ सुट्टया देणे, आसस्मीक सुट्टया १२ देणे, वेतन रजा कारखाना अधिनियमानुसार देणे, आजारी रजा १० दिवस देणे, अतिरिक्त कामाचा मोबदला वेतनासोबत देणे, वेतनाची स्लिप कामगारांना देणे, भविष्य निधीची स्लिप देणे, कामगारांच्या सुरक्षतेकरिता जोडे, हातमोजे, चष्मा, उत्तम दर्जाचे मॉस्क देणे, कारखान्याचे ओळखपत्र देणे, नविन नियुक्ती कामगाराला ३२५० रुपये व एका वर्षानंतर ६१५० रुपये देणे, कामगारांच्या ग्रेड नुसार वेतन देणे, कामगारंना सन २०१४-२०१५ दिवाळी बोनस, २० टक्के देणे, पूर्ण वेतनाच्या १० टक्के घरभाडे भत्ता देणे, कामगारांना महिन्याला दहा लीटर पेट्रोल ये-जा करिता देणे, रात्रपाळी, कामगारांना २० रुपये अतिरिक्त देणे, कापड धुणे महिन्याला १०० रुपये देणे, उपहारगृह प्रति महिना १०० रुपये देणे, यात्रा भत्ता चार वर्षातून एकदा पूर्ण वेतन देणे आदी जम्बो मागण्यांचा समावेश आहे. कारखाना अधिनियम १९४८ अंतर्गत कलम ४२ ते ५० पर्यंत पालन करण्याची मागणी केली आहे.कामगारांच्या आरोग्य सोयी सुविधेकरिता येथे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एप्रिल १९९४ मध्ये क्लेरियन कारखाना सुरु झाला होता. परंतु प्रबंधकांनी कामगारांच्या हिताकडे औद्योगिक नियोजन स्थायी आदेश १९४६ तथा बी.आय.आर.एक्ट १९५९ अंतर्गत सक्षम अधिकारी प्रमाणित केली नाही. १५ आॅगस्टला कामगार सुनिल चौधरी यांचा कारखान्यात कर्तव्यावर असतांनी मृत्यू झाला होता. सुरक्षा साहित्याअभावी त्याचा मृत्यू झाला होता. चौधरी यांच्या कुंटूंबियातील एकाला कारखान्यात स्थायी नौकरी देऊन सेवानिवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर मंच तुमसरचे अध्यक्ष हरिहर मलिक यांनी कामगार आयुक्त, कामगार मंत्री, अप्पर श्रम आयुक्त, नागपूर, सहाय्यक श्रम आयुक्त, भंडारा यांचेकडे केली आहे. २१ वर्षापासून या कारखान्यात वेतन, मूलभूत सोयी-सुविधा, कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आहे. जिल्हा पातळीपासून राज्य पातळीवर ढीगभर अधिकारी यांची फौज असतांनी काय निरिक्षण करतात, हा संशोधनाचा भाग आहे. एक कामगार संघटना संबंधित अधिकाऱ्यांकडे तशी मागणी करतात हे दुर्देव्य म्हणावे लागेल. (तालुका प्रतिनिधी)