शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१,७३५ कृषिपंप वीज जोडणीपासून प्रलंबित

By admin | Updated: August 13, 2015 01:23 IST

मागील वर्षी १,५७१ वीज जोडणीपासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांची पूर्तता सन २०१५-१६ मध्ये करण्याचे उद्दिष्ट ...

देवानंद नंदेश्वर भंडारामागील वर्षी १,५७१ वीज जोडणीपासून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांची पूर्तता सन २०१५-१६ मध्ये करण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीला आहे. यातील ८५४ कृषिपंपांची जोडणी जुलैअखेरपर्यत करण्यात आलेली आहे. १,७३५ शेतकऱ्यांनी रक्कम भरुनही त्यांच्या कृषिपंपांची अद्यापही जोडणी झालेली नाही. जुलै २०१५ अखेरपर्यत ३६,५८२ कृषिपंपांची जोडणी झाली आहे. यात मागील पाच वर्षांत १२,५५० कृषिपंपांच्या विद्युतीकरणाचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी योजना राबवित असले तरी भंडारा जिल्ह्यातील १,७३५ शेतकरी कृषिपंप वीज जोडणीपासून वंचित आहेत़ याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. १,५७१ प्रलंबित वीज जोडणी यावर्षीच्या सत्रात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीला दिलेले आहे़ यातील ८५४ कृषिपंपांचे विद्युतीकरण झाले. भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे़ कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी पूर्णत: खचलेला आहे़ शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या सहायाने शेती करण्यासाठी विशेष योजना आखली़ कृषिपंपाच्या सहायाने खरीपासह रबी पिकांची लागवड करुन जीवनमान उंचवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे़ परंतु भंडारा जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत १,७३५ शेतकऱ्यांनी रक्कम भरुनही कृषिपंपाचे विद्युतीकरण झालेले नाही. यामध्ये भंडारा तालुक्यात २४७, मोहाडी तालुक्यात २२१, तुमसर तालुक्यात ९५, पवनी तालुक्यात २१६, साकोली तालुक्यात ३०६, लाखनी तालुक्यात ४७८ तर लाखांदूर तालुक्यात १७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे ़ वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी कृषिपंप वीजजोडणी दि़३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ इतकी प्रलंबित होती़ २०१४-१५ या वर्षात २,७९८ कृषिपंप वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले़ त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यत एकुण ४,३३० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीज जोडणी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात १९२, मोहाडी तालुक्यात १८६, तुमसर तालुक्यात १६२, पवनी तालुक्यात ६७६, साकोली तालुक्यात ५११, लाखनी तालुक्यात ५२६ तर लाखांदूर तालुक्यात ५०६ वीज जोडणीचा समावेश आहे़ ३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ कृषिपंपाची वीज जोडणी प्रलंबित होती़ यामध्ये भंडारा तालुक्यात २०५, मोहाडी तालुक्यात ३३६, तुमसर तालुक्यात ९८, पवनी तालुक्यात ३३९, साकोली तालुक्यात २११, लाखनी तालुक्यात २८२ तर लाखांदूर तालुक्यात ६१ वीज जोडणींचा समावेश होता़ सन २०१४-१५ यावर्षात २,७९८ अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्राप्त झाले़ यामध्ये भंडारा तालुक्यात २२५, मोहाडी तालुक्यात ६०, तुमसर तालुक्यात १५७, पवनी तालुक्यात ५४५, साकोली तालुक्यात ५६९, लाखनी तालुक्यात ६७८ तर लाखांदूर तालुक्यात ५६४ अर्ज वीजजोडणीसाठी प्राप्त झाले होते़ मागील वर्षीचे प्रलंबित १,५७१ वीजजोडणी सन २०१५-१६ वर्षात पूर्ण करण्याचा लक्षांक आहे़ त्यापैकी ८५४ कृषिपंपांचे विद्युतीकरण झाले. खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअरवेल केल्या आहेत. यानंतर वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणकडे रितसर अर्ज केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणाही केला. जुलै २०१५ अखेरपर्यत जिल्ह्यातील १,७३५ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे विहीर व पाणी असतानाही सिंचन करणे अशक्य झाले. शासनाने विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी खोदून देण्याची योजना आखली. या योजनांचा लाभ घेत हजारो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज केले. त्यानुसार विहिरी मंजूर झाल्या. खोदकाम, बांधकाम पार पडले. याला एक ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला; पण त्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडल्या नाहीत. विहिरी पूर्ण झाल्यानंतर वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे अर्ज केले. यासाठी लागणारी अनामत रक्कम भरल्यानंतर वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही, हे वास्तव आहे.