शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेलने भंडाराची मिरची पोहचली कोलकात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता.

ठळक मुद्देबीटीबी सब्जीमंडीचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील मिरची आता थेट कोलकात्यात पोहचली. येथील बीटीबी सब्जीमंडीच्या पुढाकाराने बुधवारी २६०० किलो मिरची या रेल्वेने वरठी येथून रवाना झाली. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात येथील भाजीपाला पोहचविला जात आहे. परंतु भंडारा शहरातून भाजीपाला पाठविण्यासाठी मोठी अडचण होती ती वाहतुकीची. रस्ता मार्गे भाजीपाला लांब अंतरावर पाठविला तर वाहतुकीचा खर्च मोठा येत होता आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नव्हता. आता रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाचे मोठे दालन निर्माण करुन दिले आहे.बुधवारी भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावरुन गेलेल्या किसान रेलमध्ये २६०० किलो मिरची कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर बीटीबीचे अध्यक्ष बंडु बारापात्रे यांनी हिरवी झेंडी दाखवत निर्यातीचे नवे पर्व जिल्ह्यात सुरु केले. विकासाची वाट शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वेने नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

भारतीय रेल्वेने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन द्यावा. वातानुकुलीत डब्यांची व्यवस्था करण्यात यावी. वेळेचे नियोजन स्वतंत्र आणि हमाल व्यवस्थाही स्वतंत्र असावी. विश्वासपात्र वातावरणाची निर्मिती करावी.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी किसान रेल्वे ही सेवा भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी हितार्थ राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अत्यावश्यक सेवा प्रवास भाड्याच्या निम्मे दरात उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करु. - नितीन पाटील, वाणिज्य निरीक्षक, वरठी रेल्वे स्टेशन

 

टॅग्स :railwayरेल्वे