शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘फुटपाथ’ व्यावसायिकांना मिळणार ओळखपत्र

By admin | Updated: January 17, 2015 01:14 IST

शहरातील मुख्य बाजार परिसरात रस्त्यालगत अतिक्रम करून दुकाने थाटली आहेत. अशा फुटपाथ दुकानदारांना पालिका प्रशासन आता जागेसह ओळखपत्र देणार आहे.

प्रशांत देसाई भंडाराशहरातील मुख्य बाजार परिसरात रस्त्यालगत अतिक्रम करून दुकाने थाटली आहेत. अशा फुटपाथ दुकानदारांना पालिका प्रशासन आता जागेसह ओळखपत्र देणार आहे. यासाठी पालिकेने फुटपाथ व्यावसायीकांकडून अर्ज मागितले आहे. त्यादृष्टिने सर्व्हेक्षण व व्हिडीओ चित्रिकरण सुरू केले आहे. अतिक्रमण करणाऱ्या फुटपाथ व्यावसायीकांचे लोंढे वाढत आहे. याचा फटका शहर विकासालाही बसत आहे. फुटपाथवर व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडून पालिकेला महसूलही प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा दुकानदारांची नोंद पालिकेत व्हावी, व त्यांना कायमस्वरूपी जरी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसले तरी, जिथे आहे तिथे त्यांच्या दुकानासाठी आवश्यक असलेली जागा मोजून द्यायची. यासाठी पालिका प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे.फुटपाथ व्यावसायीकांना पालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत रोड निश्चिती करून शहरातील अतिक्रमणधारक स्थायी व अस्थायी फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष भेट घेवून सर्वेक्षण करणे सुरू केले आहे. पालिकेने अशा दुकानदारांना ओळखपत्र व जागेबाबत आवाहन केले असता ७०० अर्ज पालिकेला प्राप्त झाले आहे. यातील अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. सध्या दुकानदारांचे चित्रिकरण व फोटो काढण्याचा कार्यक्रम राबवित आहे. यानंतर पालिका प्रशासन ओळखपत्र देणार आहे.हे ओळखपत्र फेरीवाला प्रवर्गातील दुकानदारांनाच मिळणार असून बाहेरगावाहून येऊन व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे चाप बसणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.फुटपाथ दुकानदारांची होणार नोंदपालिका हद्दीतील रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांना पालिका त्यांच्या दुकानाला आवश्यक असेल तेवढीच जागा मोजून देणार आहे. यासाठी त्यांची नोंद पालिकेत रहावी, यासाठी व्हिडीओ चित्रिकरण करणे सुरू झाले आहे. फेरीवाल्यांचे संगणकीकृत नोंद पालिकेत होणार आहे. यानंतर त्यांना ओळखपत्र वितरीत करण्यात येईल. नोंदणी शुल्क व मासिक शुल्क दोनशे रूपये आकारण्यात येणार आहे.फुटपाथ दुकानदारांच्या कौशल्य वृद्धीवर भर शहरातील फुटपाथ व्यावसायिकांचा राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत समावेश करून त्यांचा कौशल्यवृद्धीवर भर देण्यात येणार आहे. बीपीएलमधील दुकानदारांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन व बँकाच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे शहरविकासाला चालना मिळणार आहे. यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे.- रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी, नगरपालिका भंडारा.