शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सूरतहून मागविलेल्या ‘ईव्हीएम’वर पटेलांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:05 IST

महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने गुजरात राज्यातील सुरत येथून मशिन पाठविले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेऊन शुक्रवारला दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देलेखी तक्रार नोंदविली : मतदानासाठी वेळ वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने गुजरात राज्यातील सुरत येथून मशिन पाठविले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेऊन शुक्रवारला दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा.पटेल म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन तर विधानसभेची केवळ एक पोटनिवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. असे असताना या पोटनिवडणुकीसाठी सुरत येथून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन पाठविण्यात आल्यामुळे संशयासाठी जागा निर्माण होत आहे. ही पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी यासाठी आणि निवडणुकीविषयी विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी या मशिनची तपासणी होणे गरजेचे आहे.कोणत्याही निवडणुकीसाठी जेवढ्या मशिन्सची गरज असते त्यापैकी १० टक्के मशिनची रॅण्डम पद्धतीने तपासणी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन होणे गरजेचे असून या पोटनिवडणुकीत या निर्देशांचे पालन होते का? असा प्रश्न खा. पटेल यांनी यावेळी उपस्थित केला.उन्हाळा खूप तापू लागल्यामुळे प्रचारसभांसाठी वेळ वाढविण्यात यावा आणि रखरखत्या उन्हामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाची वेळसुद्धा वाढविण्यात यावी, अशी मागणीही खा. पटेल यांनी केली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, स्वप्नील नशिने उपस्थित होते.आब्जर्व्हरही गुजरातहूनचभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक एन.बी. उपाध्याय, शफुल हक व तेजपाल सिंग फुल्का हे भंडारा येथे दाखल झाले आहेत. यापैकी निवडणूक निरीक्षक उपाध्याय हे गुजरातहून आले आहेत.