शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहन पुलावरून कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:07 IST

सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्दे१४ जण जखमी : वरठी बायपास पुलावरील घटना

ऑनलाईन लोकमतवरठी: सनफ्लॅग बायपास पुलावर भरधाव प्रवासी वाहनाने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन अनियंत्रित झाल्याने पुलावरून १५ फूट खाली कोसळले. या घटनेत १२ प्रवाश्यांसह दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सनफ्लॅग कंपनी जवळील वरठी बायपास पुलावर घडली. प्रवाशी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून वरठी पोलीस त्याच्या शोध घेत आहे.तुमसर- भंडारा मार्गावर धावणारे प्रवासी वाहन एम. एच. ३६ - ५६२४ ने गुरुवारला दुपारी वरठी सनफ्लॅग कंपनी जवळ असलेल्या बायपास पुलावर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. दरम्यान वाहन अनियंत्रित झाल्यामुळे सदर वाहन पुलावरून खाली कोसळले. यावेळी प्रवाशी वाहनात २० च्या वर प्रवाशी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. यावेळी वाहन चालक नशेत असल्याचे सांगण्यात येते. या घटनेत दुचाकीस्वार उमेश लांजेवार (४०) व त्याची पत्नी ज्योती लांजेवार (३५) रा. तुमसर गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर वाहन कोसळल्याने गाडीत असलेले १२ प्रवासी जखमी झाले. यात शंकर आंग्रे (३०), सुनीता आंग्रे (२७), श्रावण आंग्रे(०२), रा. भिखारखेडा, माया ठवकर (२६) रा. खापा, राजेश्वर मेश्राम (३२), शारदा मेश्राम (२५), सुरेख वंजारी (४०), अशोक वंजारी (१७) हेमलता वंजारी (३०) रा. पाचगाव, विनोद राखाडे (३५) रा. चिंचटेकडी, ज्योती लांजेवार,( ३५),रा तुमसर, जयात्रा भोयर (६०) रा. खैरलांजी यांचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे घटनास्थळावर ताफ्यासह दाखल झाले. दरम्यान त्यांनी जखमींना प्राथमिक केंद्र वरठी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींना भंडारा येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात