शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य वाहनातून प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:38 IST

जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : पोलिसांसह परिवहन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावताना दिसतात. एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रवासी मिळविण्याच्या नादात ही वाहने भरधाव पळविली जातात. यातील अनेक वाहने तर १० ते १५ वर्षे जुनी आहे.काही वाहने खिळखिळी झाली आहे; मात्र कशाचीही तमा न बाळगता चालक बिनधास्तपणे वाहन पळवित आहेत. अनेक वाहनांच्या आतील सर्व रचनाच बदलण्यात आली असून, अधिकाधिक प्रवासी नेता यावेत म्हणून प्रवाशांना धड बसताही येत नाही अशी आसने तयार करण्यात आली आहेत. नऊ आसन क्षमतेच्या वाहनात १५ ते २० प्रवासी कोंबले जातात, तर वाहनाच्या मागे आणि व्दारावर पाच ते सात प्रवासी दिसून येतात. चालकाच्या शेजारीही चार प्रवासी बसविले जातात. त्यामुळे चालकाला गेअर बदलविणेही अशक्य होते.या प्रकारामुळे एखादवेळी भीषण अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार पोलीस आणि परिवहन विभागाला माहीत आहे; मात्र ते वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत नाही. अनेक वाहनांवर तर विनापरवाना चालक वाहन चालविताना दिसतात. एक-दोन महिने कंडक्टर असलेला तरुण एका रात्रीतून चालक होतो आणि मोठ्या ऐटीत वाहन चालवितो. अशा तरुणांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविताना रस्ता कसा आहे याचीही तमा बाळगली जात नाही. रस्त्यातील खड्डयातून वाहन सारखे उसळत असते. एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेकांना त्रास होत आहे. अशा स्थितीत कालबाह्य वाहनांतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवावा लागतो.प्रवासी मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धाप्रवासी मिळविण्यासाठी खासगी वाहनधारकांची जीवघेणी स्पर्धा सुरू असते. त्यासाठी ही वाहने वेगाने पळविण्यात येतात, तसेच एखादे वाहन ओव्हरटेक करून समोर गेले, की त्याच्यापुढे जाण्याची स्पर्धा लागते. अनेकदा प्रवासी मिळविण्यासाठी मारामाऱ्या होण्याचे प्रसंग विविध ठिकाणी घडले आहेत. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी नियुक्त असलेले पोलिस कर्मचारीच त्या वाहनांमधून प्रवास करीत असल्याचे अनेकदा दिसतात.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस