शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा

By admin | Updated: May 22, 2014 00:51 IST

तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदी करणार्‍या प्रवाशांची लांबच लांब रांग

तुमसर : तुमसर रोड दक्षिण पूर्व रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदी करणार्‍या प्रवाशांची लांबच लांब रांग सध्या दिसत असून अनेक प्रवाशांना गाडीच्या वेळेआधी तिकीट मिळत नसल्याने पुढील प्रवास करताच येत नाही. रेल्वे प्रशासनाने निदान उन्हाळ्यात अतिरिक्त काउंटरची सोय करण्याची आवश्यकता असताना येथे दुर्लक्ष केल्या जात आहणे.

सध्या उन्हाळा असून सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे स्वस्त व जलद प्रवासाकरिता सर्वसामान्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य रेल्वेचे आहे. परंतु येथे रेल्वे प्रवाशांना मोठा शारीरिक व मानसीक त्रास सहन करावा लागतो. तिकीट खिडकीवर प्रचंड मोठय़ा रांगा येथे प्रवाशांना दिसत आहेत.

रेल्वे आरक्षण करण्याकरिता सुद्धा येथे लांब रांगा दिसतात. येथे रेल्वे आरक्षण खिडक्या दोन आहेत. परंतु सध्या केवळ एकच काउंटर सुरु आहे. दुसरे काउंटर केवळ नावापुरते आहे. गर्दी असताना दुसरे काउंटर रेल्वे प्रशासनाने सुरु करणे गरजेचे आहे.

सर्वसामान्य तिकीट खरेदी करणार्‍या प्रवाशांकरिता केवळ दोन काउंटर तिकीटाकरिता आहेत. लोकल, एक्सप्रेस या प्रत्येक गाड्यांचा येथे थांबा असल्याने प्रवाशांची संख्या येथे मोठी आहेत. सकाळी ८.३0 ते १0.३0 पर्यंत या तिकीट खरेदी काउंटरवर प्रचंड मोठय़ा रांगा दिसतात. गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना तिकीख खरेदी करताच येत नाही. गाडीचा थांबा दोन ते चार मिनिटांचा असल्याने अनेक प्रवाशांना प्रवास करता येत नाही. उलट्या दुसर्‍या गाडीने अथवा परत जाण्याची पाळी येथे येते. रेल्वे कर्मचार्‍यांची संख्या येथे कमी असल्याने दुसरे काउंटर सुरु करण्यात येत नाही अशी माहिती सूत्राने दिली. यापुर्वी अनेकदा तिकीटांसाठी प्रवाशांना त्रास होत असला तरी अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)