शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांशिवाय पक्षांनी केली प्रचाराला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:54 IST

भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. उमेदवारीे अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळणार असल्याने या दोन्ही पक्षांनी उमेदवाराशिवाय प्रचाराला पाच सहा दिवसांपासून सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देनावांचा 'सस्पेन्स' कायम : मतदारही संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. उमेदवारीे अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळणार असल्याने या दोन्ही पक्षांनी उमेदवाराशिवाय प्रचाराला पाच सहा दिवसांपासून सुरूवात केली आहे.या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाईची आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राहिल हे स्पष्ट आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडे ही जागा असल्याने भाजपचाही उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट आहे. आपपल्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचाराला गावपातळीपासून सुरवात झाली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभा व बैठका घेऊन उमेदवार कोण हा प्रश्न नाही तर पक्षाचा निवडणूक चिन्ह महत्त्वाचे सांगत प्रचाराला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यानुसार बुथनिहाय नव्हे तर जिल्हा परिषद गटानुसार बैठकांना सुरुवात झाली आहे.भारतीय जनता पक्षाच्यावतीनेही चार-पाच दिवसांपासून मतदारसंघात सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पक्षसंघटनेसह सामाजिक संघटना, जातीय समीकरण व नोकरदार वर्गातील संघटनाच्या प्रमुखांशी त्यांनी भेटीगाठीला सुरवात केली आहे. आमदारांनी सुध्दा जिल्हा परिषद गटनिहाय पक्षाच्या प्रचाराला सुरवात केली आहे.निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस शिल्लक आहे. मात्र अद्यापही या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स कायम असल्याने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये सुध्दा काही प्रमाणात संभ्रमात आहेत.तर भंडारा-गोंदिया मतदार संघातील मतदार सुध्दा संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चितला घेवून प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम क्षणी उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.पोस्टर, बॅनर रेडी, छायाचित्राची प्रतीक्षालोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाचा उमेदवार अद्यापही निश्चित झाला नसल्याने त्यांनी प्रिंटीग प्रेसवाल्यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले प्रचार साहित्य तयार करण्यास सांगितले आहे. तर उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच त्वरीत छायाचित्र उपलब्ध करुन देण्यात येईल, त्यानंतर त्वरीत पोस्टर बॅनर तयार करुन द्या अशा सूचना सुध्दा देऊन ठेवल्या असल्याची माहिती आहे.कार्यकर्त्यांची धुलीवंदन जोरातहोळी आणि धुलीवंदन यंदा लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी ही एकप्रकारे मेजवानीच ठरली. निवडणुकीपूर्वीच होळी आणि धुलीवंदनाला कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी विशेष मेजवानी दिल्याचे बोलले जाते.