शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

शहरातील मंगल कार्यालयांचे पार्किंग रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. ...

ठळक मुद्देरहदारीला अडथळा : अपघाताची शक्यता, पोलीस व नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. बऱ्याच सभागृहांना व मंगल कार्यालयात पार्कींगची सोय नाही. या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईच्या हंगामात तर प्रत्येक दिवस या कार्यालयात गर्दी असते. समारंभासाठी येणारे आमंत्रित पाहुणे, वऱ्हाडी, लक्झरी गाड्या, चारचाकी व दुचाकीने येतात. विशेष म्हणजे ही सर्व वाहने ठेवण्यासाठी मंगल कार्यालयात स्वतंत्र पार्कींगची सोय असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. मंगल कार्यालय किंवा सभागृह सुरु करताना मालकाला नगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. पार्कींगची सोय, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट, शेजारच्या नागरिकांना त्रास होण्याची हमी आदी अटी पूर्ण केल्यावरच पालिकेतर्फे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षात या अटीचे पालन होताना दिसत नाही. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाºया अनेक प्रसिद्ध व वर्दळ असणाऱ्या मंगल कार्यालये व सांस्कृतिक सभागृहासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे कुठलाही समारंभ व कार्यक्रम असल्यास त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या, दुचाकी व अन्य वाहने कार्यालयासमोर व रस्त्याच्या कडेला ठेवल्या जातात. विशेष म्हणजे या मार्गाने शहरातील मुख्य वाहतूक सुरु असते. मोठ्या बसेस, कार व इतर छोटी मोठी वाहन रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या मार्गाला रस्ता म्हणावे की, पार्कींग प्लेस असा प्रश्न पडतो. सभागृहाचे मालक या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे पार्कींग ही अत्यावश्यक सेवा पुरविणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. परंतु नगरपालिकांना किंवा पोलीस प्रशासन या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यांना नोटीस पाठविले जात नाही. त्यामुळे दररोज लाखोंची आवक असणारे कार्यालयाचे मालक वा संचालक या गोष्टींकडे बेजबाबदारपणे पाहत आहेत.अरुंद रस्ते, त्यातच रस्त्याच्या बाजूला अस्त्यवस्तपणे ठेवलेल्या वाहनांमुळे या रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होत आहे. अनेक वेळा सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. किरकोळ अपघाताच्या घटना रोजच्या रोज घडत आहेत. यातच वादावादीचे प्रमाणही वाढत आहेत. मंगल कार्यालय व सभागृहाच्या मालकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सामान्य नागरिकांनी का सोसावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.