शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

प्रवेशद्वारावर वाहनतळ : मार्गात अडथळे

By admin | Updated: February 11, 2015 00:40 IST

देशातील आदर्श रेल्वे स्थानकात (मॉडेल रेल्वे स्थानक) भंडारा रोड रेल्वे स्थानकाचे नाव आहे. परंतु आदर्श या संज्ञेचा अपमान होईल, अशी अवस्था आहे.

लोकमत विशेष - ४तथागत मेश्राम वरठीदेशातील आदर्श रेल्वे स्थानकात (मॉडेल रेल्वे स्थानक) भंडारा रोड रेल्वे स्थानकाचे नाव आहे. परंतु आदर्श या संज्ञेचा अपमान होईल, अशी अवस्था आहे. उंच भितीमुळे रेल्वे स्थानक दिसत नाही. प्रवेशद्वारावर सायकल स्टॅण्ड मालकाने कब्जा करून ठेवला आहे. त्यामुळे रस्ता सापडत नाही आणि धावतपळत रेल्वे दिसली तरी मार्गात लावलेल्या वाहनाची गर्दी व अडथळे यामुळे गैरसोय होते.भंडारा रोड रेल्वेस्थानक रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित आहे. हे रेल्वे स्थानक दीडशे वर्षे जूने आहे. लाखो रुपये विकास कामावर खर्च झाले परंतु वास्तवस्थिती वेगळी आहे. दिवसभर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. सुविधा मात्र नगण्य आहेत. मुख्य मार्गापासून रेल्वे स्थानक परिसरात पोहचेपर्यंत प्रवाशांना अडचणी आहेत. प्रवाशांच्या पैशातून रेल्वेला महसूल मिळतो. त्यातून कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. परंतु, ज्यांंच्या पैशावर रेल्वे कर्मचारी जगतात तेच प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. मॉडेल रेल्वे स्थानक हे नाव केवळ नावापुरते ठरले असून रेल्वे प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडला आहे. नामफलक नाहीमुख्य रस्त्यावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना जे मुख्य प्रवेशद्वार लागते त्या प्रवेशद्वारावर भंडारा रोड रेल्वेस्थानकाचा उल्लेखच नाही. फलकावर काहीच लिहिलेले नाही. याउलट रेल्वे स्थानक परिसरात कुठेही स्पष्टपणे दिसणारे फलक नाही. नव्याने येणाऱ्या प्रवाशांना इतरांना विचारून खात्री करून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. येणाऱ्याला आपण कुठे आलो याबाबत शंका वाटावी, अशी अवस्था आहे.दरफलकही नाहीरेल्वे स्थानकावर सायकल स्टॅण्ड चालकाचा मनमानी कारभार सुरू आहे. रेल्वे स्थानकावर वाहन ठेवणाऱ्यांकडून मर्जीने वसुली केली जात आहे. या स्टॅण्डवर दरफलक लावलेला नाही.भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील आवारात व सायकल स्टॅण्डवर दिवसभर जुगार खेळणाऱ्याची गर्दी राहते. सायकल स्टॅण्ड मालकाची मनमानीरेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सोयीकरीता या रेल्वे स्टेशनवर रेल्वे विभागाने खासगी कंत्राटदाराला सायकल स्टॅण्डकरिता रेल्वेने दिलेल्या शेड बाहेर वाहने उभी ठेवायला नको. पण गत अनेक वर्षापासून या सायकल स्टॅन्ड चालकाची मनमानी सुरू आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावर त्याने कब्जा केला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यावर वाहने उभी असतात. त्यामुळे घाई गर्दीत निघणारे वाहने एकमेकावर आदळतात. या सायकल स्टण्ड चालकाची अरेरावी प्रवाशासाठी त्रासदायक आहे.प्रवाशांना धन्यवाद देण्याची आठवणभंडारा रोड रेल्वे स्थानकावर आत जाणाऱ्या फलकावर नाव नाही. पण चुकीने का होईना आपण आलात. आता बाहेर गेल्यावर येऊ नका, यासाठी धन्यवाद देणारे फलक आवर्जुन लावल्याचे दिसून येते. इनकमिंग नव्हे तर आऊटगोर्इंगवर का असेना रेल्वे प्रशासनाची नजर आहे, असेच म्हणावे लागले तर चुकले कुठे.जीवघेणे अडथळेभंडारा रोड रेल्वे स्थानकावरून प्रवास करूच नका याची संपूर्ण तयारी रेल्वे विभागाने करून ठेवल्याचे दिसते. रेल्वे स्टेशनच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे लावून ठेवण्यात आले आहेत. अडथळे अनेकांचे हाथ पाय तोडण्याच्या कामी पडत आहेत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश कर्मचारी हे धावपळ करून रेल्वे पकडतात. यामुळे सदर अडथळे हे जीवघेणे ठरतात. या अडथळ्यामुळे प्रवाशांना सामान वाहून नेण्यास त्रास होतो. त्यातल्या त्यात रेल्वे स्थानक शोधत शोधत आत प्रवेश घेणाऱ्या प्रवाशांना हे रॉड लागल्यामुळे त्यांना नतमस्तक होवून समोर जावे लागते.