शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पाेलीस मुख्यालयातील शासकीय निवासस्थान भासते नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असली तर मरुद्यानाही बहरतील.याचा अनुभव भंडारा येथील पाेलीस मुख्यालयातील अपर पाेलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी येताे. अनिकेत भारती या निवासस्थानात राहायला आले तेव्हा इतर बंगल्याप्रमाणे हाही बंगला हाेता. 

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रंग उडालेले शासकीय ओसाड बंगले. वाळलेली झाडे अन् अंगणभर पालापाचाेळा. परिसरात वाढलेली झुडपी वनस्पती असे काहीशे चित्र सर्वत्र पहायला मिळते. मात्र भंडारा जिल्हा पाेलीस मुख्यालयातील एक निवासस्थान मात्र याला अपवाद आहे. काही वर्षापूर्वी ओसाड असलेल्या या निवासस्थानाचे आता रुपच पालटले. असंख्य फुलझाडे, सुगंधी, शाेभवंत पानाफुलांची आरास, आकर्षक कुंड्या जणू नंदनवनच भासते. ही किमया केली आहे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या निसर्गप्रेमी पत्नी गीतांजली भारती - पुरी यांनी.शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असली तर मरुद्यानाही बहरतील.याचा अनुभव भंडारा येथील पाेलीस मुख्यालयातील अपर पाेलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी येताे. अनिकेत भारती या निवासस्थानात राहायला आले तेव्हा इतर बंगल्याप्रमाणे हाही बंगला हाेता. मात्र त्यांच्या निसर्गप्रेमी पत्नी गीतांजली यांनी अवघ्या एक वर्षात या बंगल्याचे रुपच पालटले. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तर शेवटपर्यंत काेपरान काेपरा फुलझाडांनी व्यापला आहे. सुरक्षा भिंतही फुलानी लदबदली आहे. प्रवेशद्वार उघडताच नजर जाते ती तेथे असलेल्या तब्बल ७०० ते ८०० कुंड्यांवर. विविध प्रकारची फुलझाडे माेठ्या मेहनतीने आणि हाैसेने गितांजली यांनी लावली आहे. लहानपणापासून घरात असलेल्या शेतकरी वातावरणाने त्यांना निसर्ग प्रेमी केले. जेथे जातात तेथील निवासस्थान ते बगीच्यात रुपांतरीत करतात.आपण राहताे ते घर शासकीय असाे की स्वत:चे त्यात जीव ओतला की घर आपल्याला भरभरुन देते. असे गीतांजली भारती सांगतात. गुन्हे, तपास, धावपळ, पुरावे अशा ताणतणावात साहेब घरी परतल्यावर विसावा घेताना स्वच्छ व नितळ श्वास घेताना मनाचा थकवा कधी निघून जाताे. हे कळत नाही. पाेलीस अधिकाऱ्याची कर्तव्य निष्ठेने जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याची गृहकर्तव्यदक्ष पत्नी म्हणून माझे घर आंनदात राहील असे वातावरण निर्माण करणे हे माझे कर्तव्य असे गीताजंली अभीमानाने सांगतात. रसायण शासत्रात पदव्युतर पदवी घेतलेल्या गीतांजली यांना गार्डलींगचा छंद आहे. दिवसातील दाेन ते तीन तास या छंदाला देतात. आपल्या दाेन चिमुकल्या मुलींच्या संगाेपनासाेबतच लतावेलींचे पाेटच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात. म्हणून आज त्यांच्या निवासस्थानात पाऊल ठेवले की नंदनवनात ठेवल्याचा भास हाेताे.

सासरी जाणाऱ्या लेकीसारखी अवस्थाशासकीय अधिकाऱ्याची सतत बदली हाेत असते.प्रत्येक वेळी नवीन निवासस्थान नशीबी येथे मात्र गीतांजली भारती कुठेही गेल्यातरी आपला छंद जाेपासून परिसर झाडाफुलांनी शाेभीवंत करतात. बदली झाल्यानंतर बहरलेले उद्यान साेडून जाताना सासरी जाणाऱ्या लेकीला निराेप देतात, तसा निराेप देते. असे सांगताना गीतांजली भाऊकही झाल्या. नव्या ठिकाणी पुन्हा नव्या बगीच्याची निर्मीती करते, असा त्या सांगातात. शासकीय निवासस्थानात परसबाग फुलविली असून सर्व भाजीपाला त्यांच्याच बागेतून स्वयंपाक घरात येताे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे