शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

पंचायत समितीच्या संगणकाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

By admin | Updated: December 18, 2014 22:49 IST

पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवरून संगणक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द त्याच विस्तार अधिकाऱ्याने खंडविकास अधिकाऱ्याकडे केली. प्रतिलिपी उपविभागीय

साकोली : पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवरून संगणक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द त्याच विस्तार अधिकाऱ्याने खंडविकास अधिकाऱ्याकडे केली. प्रतिलिपी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशनला दिली. यावरून साकोली पोलीस या संगणकाच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून पंचायत समितीत चकरा मारताना दिसत आहेत.साकोली पंचायत समिती येथे महिला बचत गटाचे काम पाहणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवर संगणक लावण्यात आले होते. मात्र या विस्तार अधिकाऱ्याला दि. १४ ते १९ पर्यंत स्वच्छता अभियानादरम्यान ठरविलेल्या गावात कामानिमित्त बाहेर असताना ते २० तारखेला पुन्हा पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाले. तेव्हा त्यांच्या टेबलवरील संगणक गायब होते.या विस्तार अधिकाऱ्याने या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी यांना दिली व तक्रारीत टेबलवरील संगणक चोरीला गेल्याचे नमूद केले व याच तक्रारीची प्रतिलिपी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली. त्या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलीस पंचायत समितीत चौकशीकरिता दोन दिवसापासून येत आहेत. आधी हे प्रकरण पंचायत समितीत असल्याने त्याची खुसफूस चर्चा पंचायत समितीतच होती. मात्र दोन दिवसापासून पोलीस कर्मचारी चौकशीला येत असल्यामुळे हे प्रकरण सर्वांनाच माहित झाले असून या प्रकरणाची माहिती पंचायत समितीतील कर्मचारी, ग्रामसेवक यांना झाली आहे. त्यामुळे हा पंचायत समितीमधील वाद पोलिसांच्या चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या पंचायत समितीच्या कार्यालयात याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)