शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सिरसाळात फुलला पिवळा पळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:26 IST

वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत.

ठळक मुद्देजंगल शिवारात सौंदर्य खुलले : वृक्ष पाहण्यासाठी गर्दी

लक्ष्मीकांत तागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत. त्यामुळे या पिवळ्या फुलाच्या पळसाने जंगलाचे सौंदर्य अजूनच खुलविले आहे. केशरी फुलांच्या पळसात या पिवळ्या फुलांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.पवनीपासून सात किमी अंतरावर जंगलाला लागून सिरसाळा गावाजवळ शालू एकनाथ मेश्राम यांची दीड एकर शेती आहे. रस्त्याला लागूनच त्यांचे शेत आहे. वसंत ऋतूची सुरुवात झाल्यामुळे केशरी रंगाचे पळसाचे फुले सर्वत्र फुलले आहेत. सगळीकडे त्यामुळे आनंदमय वातावरण पसरले आहे. मात्र शालू मेश्राम यांच्या शेतात फुललेल्या पिवळ्या रंगाच्या पळसाच्या फुलांनी जंगलाच्या सौंदर्यात भर घातली आहे.या परिसरात या पिवळ्या रंगाच्या फुलाचे पळसाचे एकच झाड आहे. त्यामुळे हे पिवळ्या रंगाचे झाड पाहण्याकरिता अनेक लोक येत आहेत.शालू मेश्राम यांचे पती नवेगावबांध वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी असलेले एकनाथ मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी हे शेत घेतले तेव्हापासून पिवळ्या पळसाचे झाड होते. या फुलांना औषधी गुणधर्म असून उन्हाळ्यात उन्ह लागली तेव्हा या पिवळ्या फुलांचा काढा बनवून अथवा शरबत बनवून दिले जाते. तसेच हाता-पायांनाही या फुलांचा रस लावला जातो. त्यामुळे उन्ह कमी होते. अनेक नागरिक या पिवळ्या फुलांची मागणी करतात. या पिवळ्या पळसाचे फुले पाहण्याकरिता रोज लोक शेताला भेट देत आहेत.