पवनी : काेराेना संचारबंदीच्या काळात विकल्या जाणाऱ्या दारूविरुद्ध पवनी पाेलिसांनी धडक माेहीम हाती घेतली. ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वात शहरात सहा ठिकाणी धाड घालण्यात आली. तेथे ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताडेश्वर वाॅर्डात टाकलेल्या धाडीत रमेश तुळशीराम लाेखंडे याच्या घरी २० लिटर हातभट्टीची दारू आढळून आली तसेच देशीदारूचे पव्वेही आढळून आले. गाैतमनगरात दिलीप हिरामण माहुरे यांच्या घरून देशी दारू जप्त करण्यात आली. रामपुरी वाॅर्डातील दीपक वनवास सुपासे याच्या घरून देशीदारूच्या दाेन पेट्या जप्त करण्यात आल्या. बस्तवारी वाॅर्डातून करतारसिंग रामसिंग बावरी याच्या घरून एक पेटी दारू जप्त केली. तर मंगळवारी वाॅर्डातील धुपाेर खेमसिंग बावरी याच्या घरून ४५ नग देशीदारूचे पव्वे आढळून आले. याच वाॅर्डातील प्रमाेद दामाेदर वैद्य याच्या घरी धाड मारली असता तीन पेट्या दारू आढळून आली. या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार जगदीश गायकवाड, पाेलीस हवालदार हेमणे, शेंडे, गजभिये, कळपते, लांजेवार यांनी केली. स्वत: ठाणेदार दारू अड्ड्यावर धाड टाकत असल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.