शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी धान खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:38 IST

येथील शासकीय आधारभूत धान खरेदी उपकेंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल भरल्यामुळे आणि या खरेदी केंद्राला अद्याप पुरवठा आदेश डीओ प्राप्त न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून धान खरेदी केंद्र बंद आहे.

ठळक मुद्देगोदाम हाऊसफुल्ल : खरेदी केंद्राला ‘डीओ’ची प्रतीक्षा, शेतकरी अडचणीत

आॅनलाईन लोकमतविरली (बु.) : येथील शासकीय आधारभूत धान खरेदी उपकेंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल भरल्यामुळे आणि या खरेदी केंद्राला अद्याप पुरवठा आदेश डीओ प्राप्त न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून धान खरेदी केंद्र बंद आहे. परिणामी शेकडो पोती धान खरेदी केंद्रात उघड्यावर पडून आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले असून मळणी केलेला आता कुठे विकायचा, असा विवंचनेत शेतकरी सापडला आहे.येथील विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेच्या गोदामात दि पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्या वतीने आधारभूत धान खरेदी उपकेंद्र सुरू करण्यात आले.या खरेदी केंद्रावर ६० शेतकºयांच्या २ हजार २७ क्विंटल ६० किलो धानाची खरेदी बंद करण्यात आली.या खरेदी केंद्राला पुरवठा आदेश न मिळाल्यामुळे येथे खरेदी झालेल्या धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे धान ठेवण्यासाठी गोदामात जागाच नसल्याने नाईलाजाने धान खरेदी बंद करावी लागल्याचे केंद्रचालक हरिभाऊ नरूले यांनी सांगितले.धान खरेदी बंद झाल्याने या खरेदी केंद्राच्या पटांगणात शेकडो पोती धान उघड्यावर पडून असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या खरेदी केंद्राची एजंट दि पंचशील सहकारी धान गिरणीचे अध्यक्ष हरगोविंद नखाते यांनी खासगी गोदामाचा शोध घेतला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही.सध्या धान मळणीचा हंगाम जोमात सुरू आहे.आधारभूत धान खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे मळणी केलेला धान विकायचा कुठे, असा संतप्त शेतकºयांचा सवाल आहे. या प्रकारामुळे परिसरातील खासगी व्यापाºयांची चांदी असून शेतकरी नाईलाजाने कमी दरात या व्यापाºयांना धान विकत आहेत.या केंद्राला डी.ओ. देऊन गोदाम खाली कराचा किंवा एखाद्या खासगी गोदामाची व्यवस्था करून तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शर्थीचे प्रयत्न करीत धान ठेवण्यासाठी खासगी गोदाम मिळण्यास विलंब होत आहे. गोदाम मिळाल्यानंतर लगेच धान खरेदी केंद्र सुरू होईल.खरेदी केंद्राच्या एजंट संस्थेला ८ डिसेंबरपर्यंत गोदाम शोधण्याची डेडलाइन दिली आहे. लवकरच गोदामाची व्यवस्था होईल आणि धान खरेदी पुर्ववत सुरू होईल.- गणेश खर्चे,जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.