शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

धान उत्पादक निराशेच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 21:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा (कोसरा) : कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कोंढा येथे शेतकऱ्यांच्या धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली ...

ठळक मुद्देअत्यल्प भाव : अपुऱ्या पावसाने चौरास भागात दुष्काळाची तीव्रता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कोंढा येथे शेतकऱ्यांच्या धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेने धानाचे प्रति क्विंटल १८०० ते २००० रूपये भाव असल्याने धानाची शेती परवडणारी नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. सध्याचे धानाचे भाव चार वर्षापासून तेच आहे. कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.चौरास भाग हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी या भागात अत्यल्प पाऊस पडला. डाव्या कालव्यात वेळेवर धरण विभाग वाही पवनी यांनी पाणी सोडल्याने बऱ्यापैकी धानाचे उत्पादन कोंढा परिसरात झाले. कोरडवाहू शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. ही बाजू सोडता परिसरात बºयापैकी धानाचे पिक झाले. अवकाली पाऊस तसेच किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाल्याने प्रत्येक शेतकºयांचे उत्पादन वाढले. गेल्या चार वर्षापासून या भागातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे. यावर्षी चांगले उत्पादन झाले म्हणून दोन पैसे जमा होईल. या आशेवर शेतकरी होता. परंतु उत्पादन निघाल्यावर शेतकºयांची निराशा झाली आहे. धानाचे भाव मागील चार वर्षापुर्वी जे होते तेच आहे. या भागातील शेतकरी धानाचे बारीक व ठोकळ अशा प्रकारचे पीक घेत असतो, ठोकळ धानाला शासनाने १७५० रूपये प्रती क्विंटल भाव जाहीर केले. तसेच २०० रूपये बोनस मिळाल्यास १९५० रूपये भाव शेतकºयांना मिळणार आहे.बारीक धानाचे पीक घेणाºया शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार कोंढा येथे १८०० रूपये ते २००० रूपये प्रतिक्विंटल मिळत आहे. हे भाव २०१४ मध्ये सुद्धा होते. शासन बारीक धान उत्पादक शेतकºयांना योग्य न्याय देऊ शकले नाही. मागील चार वर्षापासून धानाचे भावात वाढ न झाल्याने शेतकरी निराश झाले आहे. दरवर्षी रासायनिक खत, औषधी, बि-बियाणे, मंजुरी यांची वाढ होते. पण धानाचे भाव वाढत नाही. धान भरडाई करून तांदुळ बनविले तर ते देखिल ३००० ते ३५०० रूपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त भाव मिळत नाही. या सर्वपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्व शेतकºयांचे परिसरात धानाचे पिक निघाले बारीक प्रतीचे धान बाजार समितीच्या उपबाजारात विकण्या शिवाय पर्याय नाही म्हणून येथील खुल्या जागेत शेतकऱ्यांनी धानाचे पोते आणून ठेवले आहे. त्यामुळे उपबाजारात एकच गर्दी वाढली आहे.धान्य खुल्या जागेतकृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे समितीने उपबाजार सुरू केला आहे. हा परिसर धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने येथे शेतकरी उत्पादन झाल्याबरोबर धानाचे पोते ठेवत असतो. हा बाजार देखिल सर्व देत नाही, असे देखिल प्रकार उपबाजार कोंढा येथे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्य समस्या सोडविण्याची मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.