शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बोनसविना धान उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने धानाचे उत्पादन घटत आहे. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, रासायनिक खत, बीजाई, शेतीउपयोगी अवजारे, इंधन आणि कीटकनाशक औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. खरेदी केंद्रावर धानाचे दर क्विंटलमागे अनेक वर्षांपासून जवळपास जैसे थे आहेत. शेतकऱ्यांना तात्पुरते खूश करण्यासाठी फसवी अत्यल्प वाढ केली जाते. मात्र त्या तुलनेत मजुरी व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी शासनाने पावसाळी धानाची खरेदी केली. परंतु बोनस अजिबात नाकारल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. तसेच कृषी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाबाबतीत शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, याची शाश्वतीही शेतकऱ्यांना उरली नाही. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने धानाचे उत्पादन घटत आहे. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, रासायनिक खत, बीजाई, शेतीउपयोगी अवजारे, इंधन आणि कीटकनाशक औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. खरेदी केंद्रावर धानाचे दर क्विंटलमागे अनेक वर्षांपासून जवळपास जैसे थे आहेत. शेतकऱ्यांना तात्पुरते खूश करण्यासाठी फसवी अत्यल्प वाढ केली जाते. मात्र त्या तुलनेत मजुरी व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गत अनेक वर्षात धानपिकाला मिळणाऱ्या बोनसमुळे शेतकरी काही प्रमाणात का होईना, पण आनंदी होता. यंदा बोनस बंद करण्याचा शासनाने करंटेपणा केल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी गोत्यात आला आहे. उशिरा का होईना, पण शासन बोनस जाहीर करेल अशी आशा होती. परंतु आता पुरता अपेक्षाभंग झाला आहे. बोनसऐवजी शासनाने धानाचे दर तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत वाढवावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.पावसाळी धान खरेदीचे चुकारे अद्यापही पूर्णपणे झालेले नाहीत. अशा अत्यंत बिकट अवस्थेत थकीत वीज बिलाचा भरणा न झाल्याने वीज वितरण कंपनीने ऐन उन्हाळी धान पिकाच्या हंगामात तुघलकी पद्धतीने कृषी पंपाची वीज कापणे सुरू केले होते. अगोदरच अनेक समस्यांमुळे ग्रस्त असलेला धान उत्पादक शेतकरी कृषी पंपांची वीज खंडित केल्याने हवालदिल बनला होता.  

शेतकऱ्यांच्या हिताचे भान ठेवून किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मिळावा अथवा आधारभूत खरेदी केंद्रावर धानाचे भाव कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल या दराने असावेत.- गंगाधर मोटघरे, शेतकरी, आसगाव.बोनस बंद झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शासनाने त्वरित एक हजार प्रतिक्विंटल बोनस द्यावा व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशीचा लाभ द्यावा.- गणेश नागपुरे, युवा शेतकरी, उमरी.

 

टॅग्स :Farmerशेतकरी