शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

प्रतिकूल हवामानाने धानपीक रोगग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

शेतकरी चिंतेत : कृषी अधिकारी शेतशिवारात, फवारणीच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. आता शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.दिवाळीपासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण कीडीला पोषक आहे. सद्यस्थितीत पालांदूर परिसरात उन्हाळी धानावर खोडकीड, करपाचा प्रादूर्भाव वाढला आहे. २०-२५ दिवसाच्या रोवणीला दोनवेळा फवारणी करूनही सुधारणा दिसत नाही. चुलबंध खोऱ्यात धानाची ५२३ हेक्टरवर लागवड झाली असून लाखनी तालुक्यात १७५२ हेक्टर रोवणी झाली आहे. एकट्या पालांदूरात हे क्षेत्र ४७ हेक्टर आहे. भाजीपाल्याचेही मोठे पीक या परिसरात घेतले जाते. धानासोबतच वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे. बाजारात धानाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची भीस्त उन्हाळी धानावर आहे. परंतु प्रतिकुल हवामान शेतकºयांना चिंतेत टाकत आहे.शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचले आहे. कृषी मंडळ अधिकारी गणपती पांडेगावकर म्हणाले, धानाचे पीक वेळीच निंदन व खुरपन करू घ्यावे, अपेक्षित खताच्या मात्रा द्याव्या, कृषी सल्ल्यानुसारच खत टाकावे, कृषी निविष्ठांचे पक्के बिल द्यावे, असे आवाहन केले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.तापमानात अनपेक्षित बदलदिवस व रात्रीच्या तापमानात अनपेक्षित बदल जाणवत आहे. धानाला उष्ण हवामानाची गरज आहे. मात्र दुपारी उन्ह आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. खोडकीडीचेही आक्रमण झाले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी पुढे सरसावले आहे.शेतकºयांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी करावी. धानात खूप पाणी साठवून ठेवू नये, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.-पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी.

टॅग्स :agricultureशेती