शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयात हाेणार ऑक्सिजन टँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांर्भियाने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन करुन देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देऊन लवकरच २० केएल ऑक्सिजन टँक भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे चाचण्यांची क्षमता वाढणार : प्रफुल पटेल यांचा पुढाकार

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनी समस्या निर्माण होत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांर्भियाने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन करुन देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देऊन लवकरच २० केएल ऑक्सिजन टँक भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहे.मागील वर्षी कोविड संसर्गाच्या काळात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख व खा. प्रफुल्ल पटेल यांनी कोविडची आढावा बैठक घेतली होती. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभारण्याचे व आरटीपीसीआर चाचणी मशीन लावण्याची सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. तसेच यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून खा. पटेल यांनी मागील तीन चार दिवसांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच शासनाशी या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १ कोटी २७ लाख ७८ रुपयांच्या २० केएल ऑक्सिजन टँक व आरटीपीसीआर मशिनसाठी २७ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे भंडारा येथे लवकरच आरटीपीसीआर चाचण्या सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.दररोज जवळपास ५०० आरटीपीसीआर चाचण्या भंडारा येथेच होणार असल्याने नागपूरला नमुने पाठविण्याची अडचण सुध्दा दूर होणार आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांचे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. माजी आ.राजेंद्र जैन सुध्दा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलOxygen Cylinderऑक्सिजन