चरण वाघमारे यांची माहिती : परिसरातील बेरोजगारांना मिळणार काम, कारखाना पूर्ववत सुरू होणारतुमसर : तालुक्यातील युनिव्हर्सल फेरो कारखाना तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या काळपासुनच बंद असून सत्तेचा मनमानी उपभोग घेणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हेतूपुरस्पर अक्षम्य दुर्लक्षामुळेच युनिव्हर्सल फेरो कारखान्याला घरघर लागली यास तत्कालीन सत्ताधाऱ्यांचेच सरकार जबाबदार आहे. सदर युनीव्हर्सल फेरो कारखाना प्रकरण कंपनी मालकास जबाबदार धरुन सदर कारखाना पुर्ववत सुरु करण्यास प्रयत्नरत असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे.औद्योगिक अॅक्टनुसार ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत अशा अनुकूल परिसरात उद्योग स्थापन करण्याचा नियम आहे. त्यानुसार जे उद्योजक उद्योग स्थान करण्यास तयार असतात. अशा उद्योजकांना औद्योगिक अॅक्ट संहितेमधील अटी, शर्ती व नियमांचे अधीन राहून व सर्व अटी, शर्तीची पूर्तता करुन उद्योग उभारावे लागते. यासाठी हमी पत्रही लिहून द्यावे लागते. सर्व अटी, शर्तीची पूर्तता करुनच युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु झाला असेल तर तो कारखाना सतत नियमितपणे सुरु ठेवणे ही कंपनी मालकाची नैतिक जबाबदारी आहे. पंरतू कोणतेही सबळ कारण नसतांना सरकारची दिशाभूल करुन कारखाना बदं करणे हे गैर आहे. युनिव्हर्सल फेरो कारखाना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळपासून बंद असून तत्कालीन सत्ताधाऱ्यांचेच हा कारखाना सुरु करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांन सदर कारखाना सुरु करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाही. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. यास तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे उपेक्षीत धोरण कारणीभूत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. युनिव्हर्सल फेरो कारखाना बंद असल्याचे निदर्शनास येताच आमदार वाघमारे यांनी युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा यासाठी दीड वर्षाच्या कार्यकाळात विधानसभेत तीन वेळा प्रश्न उपस्थित करुन शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. उद्योगमंत्री सुभाष देसाई व जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठका घेतल्या मात्र कंपनी मालक उपस्थित न झाल्याने निर्णय प्रलंबित राहीला. उद्योगमंत्री देसाई काही तकलादू राजकीय विरोधात भविष्यात श्रेय कसा मिळेल यासाठी केविलवाना प्रयत्न करीत आहेत.याबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे समवेत सांगोपांग चर्चा करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. युनिव्हर्सल फेरो कारखान्याकडे तत्कालीन तकलाूद सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला असून याप्रकरणी कंपनी मालकास जबाबदार धरुन सदर कारखाना पूर्ववत सुरु करण्यास प्रयत्नरत असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
युनिव्हर्सल फेरो बंद प्रकरणी कंपनी मालक जबाबदार
By admin | Updated: June 4, 2016 00:25 IST