आधुनिक व सुरक्षित डोंगे बनवितो छत्रपाल चन्नेमोहन भोयर तुमसरनदी व तलावात मासेमारी करण्याकरिता डोंग्याची गरज असते. डोंगा निर्मितीत सोलापूर व कोकण विभागाची मक्तेदारी आहे. जिल्ह्यात यापूर्वी नदी काठावरील गावात अकुशल कारागीर लाकडी डोंगे तयार करीत असत. परंतु ही मक्तेदारी कुर्झा येथील छत्रपाल चन्ने या तरुणाने मोडीत काढली आहे. भंडारा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातून वैनगंगेचा प्रवास सुमारे १०० कि.मी. चा आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारीसाठी लाकडी डोंगा हे सुरक्षित साधन मानले जाते. नदीकाठावरील गावातील लाकूड कामे करणारे येथे पूर्वी डोंगे तयार करीत. ते कारागिर आता कमी झाले आहेत. कुशल व सुरक्षित डोंग्याचा अभाव असल्यामुळे सोलापूर व कोकणातून जिल्हा प्रशासनाला डोंगे मागवावे लागत होते. परंतु लहान मासेमारांना हे डोंगा खरेदी परवडणारे नाही. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी छत्रपालने आधुनिक व सुरक्षित डोंगा तयार करायला सुरुवात केली. कमी किंमतीत लाकूड व हलक्या टिन पत्राच्या सहाय्याने सुरक्षित डोंगे तयार करीत आहे. राहत्या घरी तो डोंगे तयार करतो. लहान डोंग्याला तयार करण्याकरिता तीन ते चार हजाराचा खर्च येतो. एका डोंग्यातून हजार ते दीड हजार रुपये मिळतात. सुरुवातीला अनिल कावळे या मित्राने हिंमत दिल्याचे छत्रपाल सांगतो.
डोंगा निर्मितीतून केली बेरोजगारीवर मात
By admin | Updated: January 8, 2016 00:47 IST