शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

By admin | Updated: April 16, 2017 00:17 IST

हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, निळीतूनी पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी या ओळी वास्तव्यात उतरविण्यासाठी ....

‘वॉटरफुल अ‍ॅण्ड ग्रीन मोहाडी’अधिकाऱ्यांनी शोधला उपाय : मूर्तरुप देण्याची तयारी राजू बांते मोहाडी हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, निळीतूनी पाखरे पांढरी, किलबिलतात थव्यांनी या ओळी वास्तव्यात उतरविण्यासाठी मोहाडीचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला लवकरच मूर्त स्वरुप देण्यासाठी आखणी केली जात आहे.दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. माणसापेक्षा पशु, पक्ष्यांना पाण्याच्या थेंबासाठी इथून तिथे उडत जावं लागतं. पाण्याची भटकत जाणारा पक्षी प्राणही गमावतो. हे वास्तव आहे. अगदी हाच धागा पकडून मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, नायब तहसीलदार डॉ.गौरीशंकर चव्हाण, महात्मा फुले हायस्कुल मोहगाव देवीचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, कृषी पर्यवेक्षक विकास झलके, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी तहसीलदारांच्या कक्षात सभा घेतली. मोहाडी येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता पिण्याच्या पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. पिण्याच्या पाण्यावर उपाय शोधला जावा अशी संकल्पना मांडली गेली. मोहाडीच्या जलपातळीत वाढ, भूगर्भात पाणी सातत्याने जिरवता आले पाहिजे यावर ‘फुल वॉटर अ‍ॅण्ड ग्रीन मोहाडी’ हाच उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर अडीच किलोमीटरचा नाला खोलीकरण जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा कोल्हापुरी बंधारा दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ७५ लाख रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. जलसंधारणामुळे पाणी जिरणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. पाणी टंचाईवर मात करता येणार आहे.स्मशानभूमी ते न्यायालया जवळील नाल्यापर्यंत एका दिशेने पाऊलवाट. त्या वाटेवर वृक्ष लागवड करण्याची संकल्पना सूचविण्यात आली. मोहाडीकरांना सकाळची पहाट, झाडावर किलबिलणारे पक्षी, नाल्यात झेप घेऊन पाण्याची तृष्णा भागविणारे पक्षी हा नैसर्गिक अनुभव करता यावा. अडीच किलोमिटरची पायवाट मन प्रसन्न करत व्यायाम करता यावा हे स्वप्न कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोहाडी व तालुक्यातील दानशूर व्यक्ती ‘वॉटरफुल व ग्रीन मोहाडी’ या संकल्पनेसाठी सढळ हाताने मदत करावी, अशी अपेक्षा तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. परंतु ७५ लाख रूपये सामान्य हाताच्या मदतीने जमा होणार नाही, याचीही कल्पना सभेत स्पष्ट केली गेली. त्यासाठी मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग कंपनी व तुमसर तालुक्यातील मॅग्नीज ओर इंडियाच्या मालकांनी समाजाची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) चा भाग समजून आर्थिक मदत करावी यासाठी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.मोहाडीत हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोहाडी शासकीय कार्यालयाच्या विभागप्रमुखांची २० एप्रिल रोजी तहसील कार्यालयात सभा बोलाविण्यात आली आहे. नाला खोलीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याची जबाबदारी कृषी पर्यवेक्षक विलास झलके, राहुल गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नाल्यातून ३० हजार ट्रॅक्टर माती काढण्यात येणार आहे. खोली दोन मिटर असेल. त्या नाल्यात १० कोटी लिटर पाणी साठवणूक क्षमता निर्माण करण्यात येईल. एक हजार झाडे पाऊलवाटेने लावण्यात येतील. एक दिवस मोहाडीसाठीजलसंधारण चवळव व्हावी. या चळवळीला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे यासाठी १ मे कामगार दिवसाला एक दिवस मोहाडीसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. १ मे श्रमदानाचा दिवस असेल. श्रमदानामुळे जवळील गावांना उर्जा देण्याचे कार्य केले जाणार आहे.वॉटर फुल व ग्रीन प्रोजेक्ट पाणी टंचाईवर चांगला होऊ शकतो. श्रम व लोकसहभागातून मोहाडीसाठी मोठे कार्य केलं जाऊ शकते.-धनंजय देशमुख, तहीलदार मोहाडीसंरक्षित सिंचन होईल पाण्याचा पुनर्भरण होणार त्यामुळे शेती समृद्धी सोबत पाणी टंचाईची तिव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.-किशोर पात्रीकर, तालुका कृषी अधिकारी