लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या पवनी येथे पर्यटन विकासाला मोठी संधी असून येथे पर्यटन विकासासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली.पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या विकास मात्र गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. आता खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात टुरिझम सर्किट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवनी शहराच्या आसपास आलेला पर्यटन वाढीला पुरक ठिकाणांचा अभ्यास केला जात आहे. यासंदर्भात दिल्ली येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी टी. जे. अलोने नागपूर येथील संरक्षण अभियंता मिलिंद अंगाईतकर, पवनीचे तहसीलदार गजानन काकोर्डे यांनी पवनी शहराची पाहणी केली. यावेळी पवनी येथील किल्ला पुरातन मंदिरे, नदीघाटाची पाहणी केली. येथे पर्यटन विकासाला भरपूर वाव असून लवकरच येथे पर्यटन विकासाला प्रारंभ केला जाईल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.पवनी शहराच्या परिसरात पर्यटन वाढीच्या ठिकाणांचा अभ्यास पुरातत्व विभागाची चमू करणार असून त्याचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे. पवनी येथील पर्यटन स्थळ विकसित झाल्यानंतर स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान कालबध्दरितीने या पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांनी प्रयत्न सुरु केले आहे. स्थानिक प्रशासन देखील यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती खासदार मेंढे यांनी यावेळी दिली.पवनी शहराची पाहणी करताना अनील मेंढे, राजेंद्र फुलबांधे, अमोल तलवारे, मयूर रेवतकर, दीपक तिघरे, दिगांबर वंजारी, सचीन शहारे, संकुल शहारे, महेश फुंडे, मच्छींद्र हटवार, संदीप समर्थ आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक पवनीच्या पर्यटन विकासासाठी आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली. पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या विकास मात्र गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. आता खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात टुरिझम सर्किट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ऐतिहासिक पवनीच्या पर्यटन विकासासाठी आराखडा
ठळक मुद्देटुरिझम सर्किटसाठी प्रयत्न : सुनील मेंढे यांच्यासह पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी